फार फार दिवसांपासून डोक्यात होत की कुठेतरी भल्या पहाटे एकट जाव आणि शांत बसून निसर्गाची गुंजरव कान देऊन ऐकावी. अक्टोबर उजाडला आणि थंडीची जाहिरात करण्यासाठी पुण्यात सगळीकडे धुक्याने हजेरी लावायला सुरूवात केली. अशाच एका शनिवारी गप्पा मारता मारता सहपरिवार सिंहगडाला जायचा प्लान फिक्स झाला. आता प्लान ठरवल्यपसून तो इंप्लिमेंट होण्यापर्यंत काही खर नसत. तेच झाल..आमच्यातला एक वीर म्हणाला की फार लवकर नको 8:30-9 ला निघू तर दुसर्याच्या मुलीची तब्बेट थोडी डाउन झाली होती. आदल्या रात्री bachelor 's life च्या आठवणी जाग्या करत दुर्गाला मी, अण्णा आणि कौस्तुभ कॉफी-पानासाठी भेटलो. Overall अंदाज घेऊन शेवटी आम्ही मग सिंहगड प्लान कटाप केला आणि त्या ऐवजी कुठेतरी 30-40 kmच्या परीघात बाइक घेऊन हुनदडाव असा ठरलं. ही आइडिया तिघांना पटली पण पुढच्याच क्षणि वस्तुस्थितीच भान येऊन एकाने सन्माननीय माघार घेतली. शेवटी कौस्तुभ आणि मी सकाळी 6 वाजता निघायचा प्लान फाइनल केला.
सकाळी 6:10 च्या आसपास कोथरूड डेपोला कौस्तुभकडे पोचलो. त्याला उचलून मग लगेच आम्ही महात्मा सोसाइटी मधून, वारजे मार्गे सिंहगडरोडला लागलो. डोणजे फाट्याला आतमधे वळल्यावर गावातून घाटात दाखल झालो. घाटाच्या एका वळणावर बाइकला वेसण घातली आणि एका उन्चवट्यावरून पूर्वेकडे नजर टाकली.
सकाळचा सुखद गारठा हवेत जाणवत होता आणि दाट धुक्याच्या दुलाईतून झाडांचे शेंडे तेव्हढे डोक वर काढत होते. समोर उभा आडवा रांगडा सिंहगड पसरला होता आणि त्यामागून उगवणाऱ्या रविराजाची कोवळी सोन-किरणे त्या पिंजलेल्या धुक्याच्या कापसात अडकून पडत होती. एव्हाना पूर्व दिशा पिवळसर तांबड्या रंगाने उजळून निघाली होती.
मनात आणि कॅमेर्यमधे ह्या छब्या सामावून घेऊन आम्ही पानशेतकडे निघालो. 20-30 किमीची मजल मारुन वाटेत गावतच पोहे ओम्लेट मारुन अम्बे फाट्याला डावीकडे वळलो आणि छोट्याश्या खिंडीतून गुंजावणेdam backwaterपाशी आलो.
8-8:30 वाजले होते आणि तुरळक प्रमाणात गावातल्या स्प्लेनडर आणि बुलेट्स दिसायला लागल्या तर मधेच एखादा ट्रॅक्टर अडखळत अडखळत वळणा-वळणाने दूरवर जात दिसेनासा होत होता. तो संपूर्ण परिसर तंबुस रंगाच्या गावताने अच्छादुन गेला होता. गवताच्या शेंड्यावरचे रेशमी तुरे वार्यवर डोलत होते आणि पूर्वेकडची नाजूक कीरणे त्यावर पडून ते सोनेरी भासत होते. हलकेच येणार्या वाऱ्याच्या झुळकेने गवातावर लकेर उमटून लगेच लुप्त होत होती.
समोरच निल्याशार पाण्यात स्थलांतरित बदके सकाळी सकाळी आपापल्या पिल्लाना घेऊन मासेमारी करत होती. मधेच एखदा कोतवाल पाण्याच्या पृष्ठाभागाला समांतर उडत माशाचा माग काढायचा तर नेम धरून खंड्याचा बाण कुठेतरी सपकन पाण्यात घुसत होता. लहान लहान लार्क जातीचे चिमनी एवढे पक्षी आमची चाहून लागून भुरर्दशी शेजारच्या गावातून उदयचे आणि पलीकडे गावतात गायब वयचे. दूरवर एक हेरन तपश्चर्या करत पाण्यात पाय रोवून उभा होता तर थोडासा लांब एका टेकाडाच्या उतरंडीवर चरणार्या गुरांच्या गळ्यातील घन्टाची विशिष्ट मधुर किणकिण या चित्रपटाला संत शांत पार्श्वासंगीत देत होती.
थोडे फोटो काढून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो. तिथे शेतकरी आपापली गुराना चारा वैराण करून आंघोळ घालत होते. गायी म्हशी बैईल मनसोक्त पाण्यात दुबत होते आणि थोडा वेळाने शेतकरी हाताने त्यांच्या अंगावर पाणी उडवून त्याना घासून पुसून स्वच्छ करायच्या मागे होते. आंघोळ झालेले बैल न्याहारीसाठी लुसलुशित गवत खात होते आणि त्यांच्या पायाशी आश्रयाला अलेले डझन भर बगळे इकडेतिकडे उडणार्या किद्यांवर तव मारत होते. आम्ही फोटो काढावेत म्हणून थोडे जवळ गेलो आणि सगळे एकसाथ उडून आमच्या डोक्यावरून पलीकडे जाऊन बसले.
आम्ही तिथेच गवतावर बराच वेळ शांत बसून होतो. खर तर आम्हला पुढे कादवे घाटात जायचं होत पण वेळ कमी होता म्हणून अजून थोडे फोटो काढल्यावर आणि मन शांत झाल्यावरच आम्ही परतीचा रस्ता धरला ते म्हणजे पुढचा कडवे घाट एकदा पायाखालून घालायचच या निश्चयाने!