About Me

About मी मधला 'मी' हा सतत जिंकत जाण्यापेक्षा शिकत जाण्यावर विश्वास ठेवतो.

Sunday, July 4, 2010

To Do List - Things to Eat

'मधू'ची मटार उसळ
पत्ता:टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज पोस्ट ऑफिसजवळ

गरमागरम 'डांगी' पॅटीस
पत्ता: दीप बंगल्याकडून वेताळबाबा चौकाकडं जायला लागल्यावर रस्त्यात डावीकडं डांगी पॅटीस लागतं

संतोष भेळ
पत्ता: सारसबागेतील गणपती मंदिराच्या बरोब्बरसमोर आणि नवलोबा मंदिराच्या बाजूला संतोष भेळेची गाडी लागते

संतोष बेकरी मधले गरमा गरम Patis

गार गार सरी आणि वाफाळलेली कॉफी
पत्ता: अलका टॉकीजकडून शास्त्री रस्त्यावरून दांडेकर पुलाकडे जायला लागल्यावर वाटेत ज्ञानल मंगल कार्यालयाजवळ (प्रत्येक खवय्या पुणेकराला हे कार्यालय ठाऊक असेलच) पराग गार्डन हे हॉटेल लागतं

खुसखुशीत साबुदाणा वडा
टिळक रस्त्यावर हिराबाग चौकात मुंडेकर यांची साबुदाणा वड्याची गाडी लागते

तोडीची भेसळ 'मिसळ'
ब्याडगी मिरचीची पावडर आणि खास घरचा मसाला यांची वेगळी चव चाखायची असेल तर येथे जा -
- नळस्टॉप चौकाजवळ कर्वेरस्त्यावरून प्राप्तिकर सदनाकडे जाताना अशीच मस्त आणि चमचमीत मिसळ खायला मिळते. या रस्त्यावरील सीड इन्फोटेक कंपनीच्या बाजूला हेमंत भाडाईत हा त्याची मिसळीची गाडी लावतो
इतर अनेक ठिकाणी चांगली मिसळ मिळते ती ठिकाणे खालीलप्रमाणे
- बेडेकरांची मिसळ
- श्री ची मिसळ
- टिळक रोडवर रामनाथ
- श्रीकृष्ण
- काटाकिर्रर्र

चिकन थाळी
- सदाशिव पेठेतलं गोपी
- तिथूनच पुढे गेलं कि सुगरण - आता ते बंद झाला पण त्याच्या समोरच असलेल कोलाहापूर मराठा दरबार
- आत्ता नाव आठवत नाही पण पानशेत धरणाच्या अन्तुं टप्प्यात असलेली एक झोपडी वजा हौटेल
- सरोवरच चिकन प्लातर
- गुड लुच्क च इराणी चिकन रस्सा
- आवारे मेस

---------------------------------------------------------

No comments:

Post a Comment