गेल्या महिन्यात मोहरम होता सकाळी मित्राच्या गाडीतून office मध्ये जाताना bloomington radio ने या गोष्टीचा 'जिक्र' केला आणि थोडी फार माहिती दिली. विकीवरची माहिती वाचून मला समजल कि मोहरमला एका इस्लामी वीराच्या बलिदानाची पार्श्वभूमी आहे. वाचून चटकन जाणवलं कि आपल्या इतिहीसात इतके महान योद्धे होऊन गेले पण आपण त्यांच कधी स्मरण करतो का ! त्यांच्या स्मरणार्थ त्यांना साधी श्रद्धान्जलीतरी वाहतो का! डिसेंबर २०१० च्या पहिल्या आठवड्यात श्री विश्वास पाटील यांचा सकाळमधला लेख वाचला आणि मन अत्यंत व्याकूळ झाल. 'पानिपतच्या ओल्या जखमा' हा त्यांचा लेख खरोखरच डोळे ओले करून गेला.
१४ जानेवारी २०११. बरोबर २५० वर्षांपूर्वी याच दिवशी पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला होता.
लहानपणी आजी आजोबांकडून 'पानपताची' गोष्ट ऐकली होती. संपूर्ण गोष्ट काहीच वेगळी नसायची पण आजी आवर्जून सांगायची ते काही संदर्भ अजून लक्षात आहेत. गोष्ट शूर बाजीराव अणि त्याचा भाऊ (चिमणाजी)अप्पा अशी सुरु व्हायची आणि विश्वासरावांवर यायची. "अरे विश्वासराव अत्यंत देखणा होता, गोरापान लाल बुंद (इति आजोबा). अगदी कोवळा रे.. सदाशिवरावभाऊ त्याला घेऊन गेला पानपतावर. अंबारीत बसला होता तेव्हा गोळी लागली आणि गेला. तो गेला पाठोपाठ भाऊ गेला बघ. काय उगाच सगळ्या बायका मुले सगळे घेऊन गेले बरोबर देवदर्शन करण्याकरता. मधेच बाबा - आजोबा सांगायचे कि उगाचच महिना महिना वेळ लावला भाऊने. हे सगळं ऐकून माझा मात्र गोंधळ व्हायचा. भाऊ कोण ? विश्वासराव कोण ? मग पेशवे नक्की कोण ? माझ्या आज्जीचा स्वरसुद्धा कापरा व्हायचा पेशवाई, बाजीराव, सदाशिवराव भाऊ, विश्वासराव आणि पानिपत वगैरे सांगताना. ती हे सगळं मुळी इतक्या कळवळीने सांगायची कि मला वाटायचं कि हे सगळे लोक आमच्या नात्यातलेच आहेत. हा गोंधळ व्हायचं अजून एक कारण म्हणजे माझ्या आज्जीच्या २ सख्ख्या भावांची नाव अप्पा आणि भाऊ. बर, त्यांच्यातल्या एकाच्या मुलाच नाव विश्वास :) त्यातून अजून एक गम्मत म्हणजे माझ्या आजोळी कोकणात माझ्या आईच्या काकाचं नाव बाजीराव (बाजीरावाबद्दल आजीने संगीतल्यामुळे मी त्यांना पुढे बरेच दिवस घाबरून असे :) ). त्या लहान वयात ह्या थोर मंडळी मधली नाती गोती माहित नसल्याने हा गोंधळ होण स्वाभाविक होत. यातला विनोदाचा भाग सोडता आजीच्या गोष्टीतून एवढाच बोध व्हायचा कि मराठे हरले. पेशवाईला घातक ठरलेल्या ह्या लढाईत जे कमावल होत ते सगळ सगळ गेल. मग आज्जीच म्हणायची कि "पुढे माधवरावाने पुष्कळस परत मिळवल म्हणा" मला भीती वाटायची कि बर झाल बुवा मराठ्यांना हरवल्यावर तो अब्दाली इकडे पुण्याला नाही आला.पुढे शाळेमध्ये इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा या लढाइच फार काही विस्तृत वर्णन कधीच नव्हत. मराठ्यांचा पराभव झाल्यावर अब्दाली आपल सैन्य घेऊन परत आपल्या देशाला निघून गेला एवढाच संदर्भ होता. माझ बालमन विचार करीत असे कि हा जिंकल्यावर असा नुसताच परत का गेला? पण हि उत्तर मला इतिहाच्या पुस्तकात कधीच सापडणार नव्हती. ५वि ६वी च्या पुस्तकात शिवाजी महाराजांवर १-२ धडे आणि पेशव्यांवर २-३ पाने सोडली तर संपूर्ण इतिहासात गांधीगिरीच होती. लाल महालातुन दादोजी कोणदेव यांचा पुतळा आणि इतिहासाच्या पुस्तकातून अफजलखान वध काढणाऱ्या सरकारने पेशव्यांच्या इतिहासाची पान कायमची फाडली नाहीत हेच पुष्कळ झाल! इतिहासाच्या नाही पण पुढे मराठीच्या पुस्तकात भाऊसाहेबांच्या बखरीतला दत्ताजी शिंद्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा एक धडा होता. त्यानंतर खूप इच्छा असूनसुद्धा कॉलेज मध्ये असताना कधीच पानिपत वाचायचा योग नाही आला. अधून मधून मोडकी तोडकी माहिती मिळत असायची. खूप नंतर म्हणजे अगदी २००६ मध्ये श्री विश्वास पाटील यांच पानिपत वाचायला घेतलं तेव्हा बर्याच गोष्टींचा अगदी निट उलगडा झाला. मनातले प्रश्न, शंका सगळ्याचं उत्तर मिळालं आणि मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याच वर्णन वाचून उर अभिमानाने भरून आला. पुस्तकाच्या शेवटी दिलेली छायाचित्रे आणि स्थानिक लोकांबाद्द्लची माहिती, त्यांचे विचार वगैरे सगळ वाचून हे युद्ध किती व्यापक होत हे जाणवलं. काही केल्या युद्धाच ते वर्णन आणि ती झिंग उतरत नव्हती. पानिपतच्या अगोदर काही दिवस झालेली शिंद्यांची लढाई जी पानिपतची नांदी ठरली. 'बचेंगे तो और भी लडेंगे' म्हणणारे दत्ताजी शिंदे सारखे सारखे आठवत होते. याच दरम्यान कुठेतरी जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची 'Catastrophe Theory ' वाचली. 'पानिपतची लढाई मराठे जिंकतात. फक्त मुंबईवर अजूनही ब्रिटीश राज्य करतात. १९९९ पर्यंतच मुंबईवर ब्रिटीशांचा अधिकार राहणार असतो. पुणे हि भारताची राजधानी होते आणि देशाचे पंतप्रधान तिथूनच संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवतात आणि त्यांना पेशवा म्हणून संबोधल जात.' क्षणभर मीच या संकल्पनेत हरवून गेलो. पण तन्द्रितुन बाहेर आलो तेव्हा जखमा वहायला लागल्या लागल्या होत्या. अनेक प्रश्न मनात ठाण मांडून बसले होते..
' अनेकदा राहून राहून वाटल कि का मल्हारराव होळकरांनी नाजीबाला सोडला आणि का नाही तिथेच त्याला मारला? का भाऊसाहेब सगळं लवाजमा घेऊन निघाले ? आणि कुंजपुरा मारल्यावर मराठे लगोलग दिल्लीस का नाही परतले? बहुतेक याच वेळात मराठ्यांच्या नकळत आणि गस्तीपाथकाची नजर चुकवून अब्दालीने ४ ठिकाणी यमुना ओलांडली. मराठ्यांना रसद पुरवणाऱ्या गोविन्द्पान्तांवर हल्ला करून लाखोंची रसद तर लुटलीच पण इथूनच मराठ्यांची उपासमार चालू झाली आणि शेवटी सोबत असलेल्या जनावरांचा अन्न खून राहायची वेळ आली. खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही. लढाईला सुरुवात झाल्यावर सोबत उपासमार झालेलं सैन्य असूनसुद्धा सुरुवातीला झालेली मराठ्यांची सरशी हे त्यांच्यातल्या लढाऊ बाण्याच द्योतक आहे. इब्रःहीम खान गर्द्याच्या तोफांनी गिलचे भाजून निघत होते, गोलाईची लढाई जंग जिंकत होती. मराठे जिंकणार हे चित्र दिसत होत पण इब्राहीम खान वरचढ चढू नये म्हूणून म्हणा किंवा उतावळेपणे म्हणा पण गायकवाड - विंचूरकरांनी आपल सैन्य एक अंगाने जास्त पुढे घुसवल. गोलाई मोडली आणि इब्राहीम खानाला तोफखाना बंद करण भाग पडल. त्याच वेळेस नाजीबाने पळून जाणार्या अब्दालीच्या सैन्याला गाठून परत युद्ध करायला पिटाळल. हळू हळू अफगाण सावरत होते आणि मराठी सैन्याला प्रतिकार करू लागले. सततची उपासमार आणि हालापेष्ट काढलेल्या मराठी सैन्याला मध्यान्हिच्या आसपास युद्ध भारी पडू लागल. त्यांचा प्रतिकार कमी होऊ लागला, त्यातून सूर्यकिरणे थेट डोळ्यात जाऊ लागली, घोडे बुजु लागले, मराठ्यांचा धीर सुटू लागला आणि आघाडीला खिंडार पडू लागल. तरीसुद्धा दुपारपर्यंत बहुतेक सर्व मराठा सरदार आपापले मोर्चे सांभाळून खडे होते. एवढ्यात हत्तीवर बसलेल्या विश्वासरावांना बंदुकीची गोळी लागली ते पाहून सदाशिवराव भाऊ स्वतः हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वर झाले. परिणामी दोन्ही हत्तीवरच्या अंबार्या रिकाम्या पाहून मराठा सैन्याने हाय खाल्ली, भाऊ गेल्याच्या अफवा उठल्या, त्यातच कुंजपुर्याच्या लढाईत बंदी म्हणून आणलेल्या सुमारे १००० अफगाण कैद्यांनी आतून उठाव केला आणि सगळीकडे एकच पांगापांग झाली. साधारण याच सुमारास अब्दालीने राखीव दलाच्या तुकड्या रानागणात पाठवल्या होत्या. सदाशिवराव भाऊ रणांगणात लढता लढता धारतीर्थी पडले आणि अखेर पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला. पराभव झाला म्हणण फार फार जीवावर येत. तरीसुद्धा जिथे कुठे पानिपत संग्रामाचा संदर्भ असेल ते सर्व मी वाचतो. अगदी अ पासून इति पर्यंत का कुणास ठाऊक पण 'End result' माहिती असूनही पानिपतच्या संग्रमाबद्दलच साहित्य एकाच वेळी हवहवस आणि नकोनकोस होत. आपला आवडता संघ एखादी अटीतटीची match हरावा आणि तरी सुद्धा आपण त्या सामन्याचे highlights पाहावेत तस होत. पानिपत एक 'नाश' नसून 'नशा' आहे. या लढाईची जादूच अशी आहे. अनेक वर्षांनंतर अखंड भारताच्या संरक्षणासाठी प्रांतवादी मनोवृत्ती मोडून कोणतरी बाहेरच्या शत्रूशी भांडत होत. बाजीरावांनी आणि चिमणाजी अप्पांनी या अगोदर दिल्लीच्या तख्ताला हादरवल होतच. सदाशिवराव भाऊंनी दिल्ली परत एकदा काबीज केली होती. पानिपतावर मराठे अत्यंत प्रतिकूल परीस्थित लढले, नेतृत्वाकडून चुका नक्कीच झाल्या पण आपली जिद्द, लढाऊ बाणा आणि स्वाभिमान अशा परिस्थितीतहि कायम ठेवून गरम लाल रक्ताच्या भगव्या वीरांनी पानिपत पवित्र केल ते आपल रक्त सांडून. दोन अद्वितीय सैन्यामधली हि तुंबळ लढाई नक्की कोण जिंकल हे सांगणचमुळी कठीण आहे. दोन्ही बाजूंच नुकसान अमाप होत. Maratha Confederacy मोडली हे खर असल तरी अब्दालीला जबरदस्त फटका बसला. त्याच्या सैन्याने या युद्धाचा मोठा धसका घेतला. दिल्लीची व्यवस्था लावून परत जाणाऱ्या त्याच्या सैन्याला चित्र-विचित्र आवाज यायचे, रात्रीच्या अंधारात पांढऱ्या आकृत्या दिसायच्या, घोड्यांच्या टापाचे आवाज आईकू यायचे. यावरून त्या घन घोर संग्रामाची सैनिकांना किती धास्ती बसली होती हे समजत. त्याच्या सैन्याने परत भारतावर चाल करून यायची स्वप्नदेखील पहिली नसावीत. स्वतः क्रूरकर्मा अब्दाली पानिपतची जखम तोंडावर वागवत जगला आणि त्यातूनच उद्भवलेल्या cancer ने पुढे मरण पावला. भारत म्हणजे "आओ जाओ अपना घर" समजणाऱ्या अफगाणांची मराठ्यांनी चागलीच जिरवली. मराठे युद्ध हरले पण त्यांनी परकीय शत्रूच कम्बरड मोडलं आणि त्याला परत जायला भाग पाडलं. या संक्रांतीला पानिपतच्या या महासंग्रामाला अडीचशे वर्ष पूर्ण झाली. स्वतःच्या प्राणांची आहूत देऊन अखंड भारताची अस्मिता जपणाऱ्या त्या शूर वीरांचा मला प्रचंड अभिमान आहे. तुमच्या आमच्या लाडक्या मराठ्यांनी पानिपतावर स्वतःच बलिदान देऊन देशाच स्वातंत्र्य अबाधित राखलं.पानिपत हरलो तरी पानिपत घडण महत्वाच होत.कारण त्यामुळेच आपण आज संक्रांत साजरी करू शकलो.मित्रहो,सण जरूर साजरा करा पण त्या आनंदाबरोबर आपल्या वीरांच्या शौर्याने उर भरून येउद्या.गोड धोड जरूर खा पण एकदा तरी त्यांच्या पवित्र बलिदानाच स्मरण करा. आज आपण त्याना फक्त मुकपणे श्रधान्जली वाहू शकतो. पण पानिपतानंतर मोडकळीस आलेल मराठा साम्राज्य माधवरावांनी - महादजी शिंद्यांनी अत्यंत जिद्दीने आणि हिमतीने परत उभ केल. परत एकदा यामुनेपर्यंत धडक मारून दिल्लीवर आपलं प्रभुत्व संपादित केल. हीच माझ्या मते खर्या अर्थाने पानिपतात धारतीर्थी पडलेल्या वीरांना वाहिलेली श्रद्धाजली होती.
अधिक वाचनासाठी खालील लिंक नक्की पहा:

- अब्दालीने अपल्यासोबत बंदी म्हणून नेलेल्यांचे अणि युदधानंतर पानिपतच्या आसपास कायमस्वरूपी राहिलेल्या लोकंबद्दल्ची माहिती http://en.wikipedia.org/wiki/Descendants_of_Maratha_prisoners_of_war_(1761)
- लोकसत्ता मधील मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे यांचे सुन्दर विवेचन http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=127671:2011-01-07-12-48-59&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
- अमृतमंथन @ वर्डप्रेस
- पानिपताच्या ओल्या जखमा- श्री विश्वास पाटील
- ऐन पानिपतावर श्री. विश्वासरावांशी झालेल्या गप्पा (Video)
No comments:
Post a Comment