About Me

About मी मधला 'मी' हा सतत जिंकत जाण्यापेक्षा शिकत जाण्यावर विश्वास ठेवतो.

Sunday, November 20, 2011


अगदी परवा परवा घडलेला प्रसंग. माझ्या  मुलीला  गोष्ट  सांगून  झोपवायची  जबाबदारी  माझ्यावर  होती. गोष्टी  काय बा सांगायला  खूप  होत्या  म्हणून  म्हणल कि  यावेळी  जरा  वेगळा  काहीतरी  म्हणजे  एखाद गाण किंवा एखादी छानशी कविता सांगावी. अचानक एक  कविता आठवली आणि  मी  ती  म्हणायला  सुरुवात  केली "केळीच्या  बागा  मामाच्या  पिवळ्या  घडांनी वाकायच्या..." हळू  हळू  करता  करता  मला  बरीच  कविता  आठवली आणि  तशी  मी छोट्या मैत्रेयीला म्हणून  दाखवली. नंतर सहज आठवत गेलो आणि बर्याच कविता आणि धड्यांचा संदर्भ लागत गेला. तेव्हाच मनात आल कि जे आठवतंय किंवा नेट वर मिळेल त्याच एक संकलन का करू नये !

मायबोली, आठवणीतील कविता , मराठी माती आणि इतर बरीच वेब पेजेस रेफर केली आणि एखाद्या उत्खननातून ज्याप्रकारे काळाच्या ओघात एखाद लुप्त झालेलं संपूर्ण जीवनचक्र एकेक करत उलगडाव तसा काहीसा प्रकार झाला. इतकी वर्ष विस्मृतींच fossile होऊन पडलेल्या असंख्य कविता, धडे, वचन, चाली आणि त्याचाय्शी निगडीत अनेक गमतीजमती डोळ्यसमोर तरळल्या. अनेक  कविता, धडे अगदी पुस्तकातल्या चित्रांसकट स्पष्ट आठवले. यातलेच काही धडे - कविता खाली देत आहे      
                                                                       
'केळीच्या बागा मामाच्या' हि  कविता  बालभारतीमध्ये इयत्ता १ली किंवा २री मध्येअगदी शेवटच्या पानावर होती. माहिती  नाही  का  असा  पण  बहुतेक  सुट्ट्या लागायच्या  आधी  मुलांनी  हि  कविता  वाचावी  असा  मानस  असावा :)

केळीच्या  बागा  मामाच्या  पिवळ्या  घडांनी वाकायच्या
..
..
आत्या  मोठ्या  हाताची
भरपूर  केळी  सोलायची
......
आज्जी  मोठ्या  मायेची
भरपूर  साय  ओतायची
ताई  नीटस  कामाची
जपून  शिकरण  ढवळायची 
आई  आग्रह  कायची
पुरे  पुरे  तरी  वाढायची
वातीवार  वाटी  संपवायची
मामाला  ढेकर  पोचवायची

एवढी कविता आठवायचं अजून एक कारण म्हणजे माझ्याकडे "बोलकी बालभारती" नावाची एक audio कॅसेट आहे. त्यामध्ये सुंदर चालीसाहित हि कविता रेकॉर्ड केली आहे.

----
त्यानंतर कागदाच्या होडीवर बसलेल्या बेडकाच चित्र असणारी पावसाची कविता आठवते

आभाळ  वाजलं  धडाड धूम
वारा  सुटला  सु सु सुम
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहील सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभार जाऊन बुडली बुडली  बोटीवर बसला बेडूक तो ओरडला डराव डूक डराव डूक
----


चिऊताई वर एक कविता पुसटशी आठवली

वडा मिळाला चीउताईला
शिरा मिळाला चीउताईला
वडा मिळाला चिऊ चिऊ चिऊ
शिरा मिळाला चिऊ चिऊ चिऊ 

---
काळजाला भिडणारा देवदत्त नावाच्या राजकुमाराचा धडा होता. त्याला एक राजहंस दिसतो पण तेवढ्यात त्याला कोणतरी बाण मारतो. हंस घायाळ होतो आणि देवदत्त त्याला वाचवतो. यावरून तो शिकारी आणि देवदत्त यांचा एक संवाद होता. पण पुढच काहीच आठवत नाही  :)
----
इयता २रि

२रि ला गोगलगाय बारशाला जातात आणि लग्नाला पोचतात त्याच वर्णन होत एका गोष्टीत



लहानपणी  रविवारी  सकाळी  सकाळी उठून  घरच्या घड्याळासमोर  उभा  राहून मी एक 'घड्याळबाबा' नावाची कविता म्हणत असे :)


इयता ३रि

३रि मधली एक कविता 'कोण गे त्या ठायी राहते ग आई' यामध्ये एक मुलगा वडाच्या झाडांमध्ये बसलाय आणि आजूबाजूला पारंब्या लोबत आहेत अस चित्र होत हिरव्या रंगातल. काहीतरी ......"वाकुल्या दाखोनी" (संध्याकाळच्या कलत्या उन्हात झाडाच्या चित्रविचित्र सावल्या त्या मुलाला तशा भासतात) अशी ओळ होती कवितेत. का कुणास ठाऊक पण हि कविता वाचताना एक अनामिक हुरहूर लागून राहायची. काहीतरी धीर गंभीर आणि अजब फिलिंग यायचं :) कविता काहीशी अशी होती


कोणे  गे  त्या  ठाती  राहते  गाई  
चिंचांच्या  सावल्या  नदीत  वाकल्या 
हाक  मी  मारिल्या  वाकुल्या  दाखोनी 




एकीचे बळ हा अजून एक धडा होतं आपल्याला.



इयत्ता ३रि
तळ्याकाठी  गाती लाटा  लाटांमध्ये  उभे  झाड 
झाडावर  धीवाराची  हले  चोच  लाल  जड 
शुभ्र  छाती  पिंगे  पोट  जसा  चाफा  यावा  फुली 
पंख  जणू  थंडीमध्ये  बंदी  घाले  आमसुली 
जांभळाचे  तुझे  डोळे  तुझी  बोटे  जास्वंदाची 
आणि  छोटी  पाख्रची  पिसे  जवस  फुलांची 
गाड्या  पाखरा  तू  असा  सारा  देखणं  रे  कसा 
पाण्यावर  उडताना  नको  मारू  मात्र  मासा 
अजून  एक  धडा  म्हणजे  -- आमचा  खंद्या  एक  कुत्र्यावर  होता . हा  कुत्रा  गायीचे  प्राण  वाचवतो . पुढे  नंतर  तो आजारी  पडतो  त्याला  कुठलीतरी  गाठ  येते  आणि  तो  मारतो 

बालभारतीच्या पुस्तकामधली पहिली कविता
AAj ये  अन  अ  पाहुणा  गोजिरा 
ये  घर  अमुच्या  सोयरा  गोजिरा 
वाजता  नौबती  ये  सखा  सोबती 
खेळावा  संगती  हा  जरा  लाजरा 

माझा  खाऊ  मला  द्या  -- ईयत्ता  ३रि 
शाळेच्या  शेवटच्या  दिवशी  सर्व  मुले  एकत्र  काम  करतात . कुणी  झाडझूड  करतो . कुणी  फळा  पुसतो . कोणी  फोटोसाठी  हर  करतो , कुणी  मैदान  झाडतो , कुणी  बसायची  सतरंजी  व्यवस्थित  करतो , कुणी  सुविचार  लिहितो.   आणि  मग  बहुतेक  कचरा  कुठे  टाकावा  हा  प्रश्न  अडतो  तेवा  कोणतरी  कचर्याच्या  डब्यावर  लिहिले  असते  कि  माझा  खाऊ  मला  द्या 



'तोडणे सोपे जोडणे अवघड' असे नाव त्या धड्याचे.
एक दरोडेखोराचा धडा पण होता. जंगलातील वाटसरूंना तो मारयचा. मग त्याला एक नारद किंवा गौतम बुद्ध (कोण ते नक्की आठवत नाही) अस कोणतरी भेटत आणी ते त्याला झाडाची पाने तोडून परत जोडायला सांगतात व त्याचे मतपरिवर्तन होते..
----
'एकमेका सहाय्य करू'
एका रात्री धर्मशाळेतील एकाच लहान खोलीत एक वाटसरु उतरतो. मात्र नंतर दुसरा तिसरा आणी चौथा असे ३ जण येतात. खोली अतिशय लहान असते मग ते फक्त उभे राहू शकतात. मात्र एकमेकांच्या जवळ उभे राहण्याने त्या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यात ऊब निर्माण होते. बहुतेक  हा  धडा  धीवर  पक्षच्य  कवितेच्या  आधी  होता .




इयत्ता ४

अजून एक गंमतशीर 2 ओळी आठवतात.
माकडे  निघाली  शिकारीला
उसाची बंदूक  खांद्याला
--
आणि एक रक्तदान ..सर्वश्रेष्ठ दान नावाचा धडा




५ वीतला राजकन्येचा चेंडू हरवतो तो धडा.....
त्या राजकन्येचे नाव बहुतेक मंजिरी असते. ते काव्य गदिमांचे होते बहुदा. तो चेंडू एका सशाला सापडतो. पण तो परत देण्यासाठी तो जाम भाव खातो. तो राजकन्येला म्हणतो की मी तुझा चेंडू परत करीन पण एका अटीवरः जेवेन तुझ्या बशीत, झोपेन तुझ्या कुशीत


इयता ७ वी

लळा  - कुत्राय्च्या  पिल्लाचा  धडा  - लेखक अनिल अवचट. एक लहानस कुत्र्याच पिलू ते घरी आणतात. पण ते फार खोडसाळ असत आणि घरभर घाण करत. सरतेशेवटी लेखक पिल्लाला दूर एके ठिकाणी सोडून येतो पण घरी येईपर्यंत पिलू त्याच्या घरी आलेले असते. मग लेखक पिलाला खूप दूर सोडून येतो त्यानंतर काही ते परत येत नाही. पण आता लेखकाला अस्वस्थ वाटायला लागत म्हणून तो पिलाला जिथे सोडल होत तिथे जातो तर ते पिलू निपचित पडलेल असत एका हमरस्त्याच्या मधोमध. कुठल्यातरी गाडीखेली येऊन मेलेलं असत. एक फार उदास वाक्य मला आठवतंय या प्रसंगच वर्णन करणार 'त्याच्या आतड्याची दोरी लांब पसरली होती ...' फार वाईट वाटायचं ते वाचून
                                                                                                                           
इंदिरा गांधी च्या लहानपणीचा तो धडा - गच्चीवर जाऊन बाहुली जाळून टाकतात. त्यांच ते  आनंदवन  का  भुवन  नावच  घर . सगळा श्रीमंती थाट. त्यांच्या  आई  फार  नाजूक  कांतीच्या  आणि खादिच्या साडी  ने  त्यांना  त्रास  व्हायचा. छोटी  इंदिरा  हे  सगळ  बघत  असते आणि  मग  तिला  पटकन  आठवत  कि  आपली  लाडकी बाहुली  वीदेशी आहे. बरीच  घालमेल  होते. पण शेवटी छोटी इंदिरा ती बाहुली गच्चीवर नेऊन जाळून टाकते

सर्वात आवडणारा आणि आवर्जून वाचायचो तो रुस्तुम ए सिंग हरबानसिंग चा  धडा. इतरांप्रमाणे मलाहि प्रचंड आवडायचा. बर्याच  पैलवानाच  वर्णन  होत  त्यात. पहाडासारखा किंगकॉंग, अक्राळ-विक्राळ झीबिस्को आणि  संगमरवरी  रेखीव  स्नायूंचा  रुस्तुम  ए  सिंग  हर्बंसिंग  असं वर्णन  होत. झीबिस्को  बेमुर्वतखोर पणे  साखळदंड दोन हातात धरतो आणि जसे त्याचे स्नायू फुगतात तशी साखळदंडाची एकेक कडी केविलवाणेपणे उलु लागते अस ते वर्णन होत. झीबिस्को साखळदंड तोडून  लोकांवर  भिरकावत  असतो  आणि  खदखदा हसत असतो. तो लोकांना आवाहन देत असतो आणि ते  ऐकून  हर्बंसिंग त्याच्यासमोर  उभा ठाकतो. पहिल्या  कुस्तीत  झीबिस्को  हर्बंसिंग्ला  मैदानातच  येऊ  देत  नाही . मग  हर्बंसिंग  त्याच्या  डोळ्यात  माती  फेकतो. अचानक  झीबिस्को  डोळे  चोळू  लागला  अस  वर्णन  होत आणि पुढच्याच क्षणि हर्बंसिंग त्याच्यावर स्वार होतो आणि  त्याला  चीतपट  करतो.
मग  दुसरी  लढत  होते . त्याआधी  हर्बंसिंग  बराच  अभ्यास  करतो. झीबिस्कोची  पकड  अत्यंत  मजबूत  असते  आणि त्यावर  आजपर्यंत  इलाज  नसतो . लढत  सुरु  होते   आणि  सलामीलाच  armlock . झीबिस्को  हात  आवळत  असतो  आणि  शरणागती  मागत  असतो . इतक्यात  हर्बंसिंग पलटी मारून त्याच्या  मानगुटीवरच  बसतो  आणि  पकड  सुटते. क्षणात चित्त्याच्या चपळाईने हरबान्सिंग विजेसारखा  झीबिस्कोवर  कोसळतो  आणि  झीबिस्को  पडतो. त्याच्या  पाठीला  जबरदस्त  दुखापत  होते . झीबिस्कोला  घेऊन  जातानाच  हरबांसिंगच  वाक्य  फार  आवडायचं  मला . हर्बंसिंग  म्हणतो  "मित्र  तुझी हि  अवस्था  बघून  मला  खेद  होतोय  रे"

इयत्ता ९
एका गावातले लोक श्रमदानातून रस्ता तयार करतात. लेखकाने त्या गावच आणि रस्त्याचं वर्णन एकदम मस्त केल होत. त्यातली काही वाक्य आठवतात. चढण चढताना बैल उरी फुटायचे. "उरी फुटणे" हा वाक्प्रचार पहिल्यांदा आईकाला होता त्यावेळी. याच धड्यामध्ये त्या रस्त्याच काम चालू असताना  एक कठीण दगडावर पहार आपटते आणि दगड काही केल्या फुटत नाही पण प्रयत्न चालू राहतात आणि शेवटी तो दगड फुटतो. त्या क्षणाच वर्णन एका मजेदार वाक्याने केल होत. "आणि दगड बद्द वाजला" :)

काळ्या  मातीत  मातीत  तिफण  चालते  - श्री वा कुलकर्णी  यांनी  अत्यंत  सुंदर  रीतीने  ती  वाचून  दाखवली  होती. बहुतेक ९ वीला होती हि !

भरून  आलेल्या  आभाळावर एक कविता होती 'जलदाली' नाव होत. थोडीफार  आठवते मला  ती  अशी  होती

थबथबली ओथंबून  खाली  आली
जालदाली  मज  दिसली  सायंकाळी
रंगही  ते  नाच  येती  वर्णायाते
सुंदरता  मम  त्यांची  भुलवी  चीत्ता


Tomato विकनार्यावर एक धडा होता हा धडा माझ्या आठवणीप्रमाणे लेखकाने स्वतःच्या बालपणीच्या अनुभवावर लिहीला होता. Tomato विकणारा त्याचा 'बाप' असतो. सुरुवातीला tomato विकले जात नाहीत म्हणून भाव थोडा कमी लावतो पण तरीही काहीच फरक पडत नाही. शेवटी गिर्हाईक इतक पडून भाव मागत कि बाप शिवीगाळ करतो आणि चिडून सगळे tomato पायाने तुडवतो.

कुणाला रजिया पटेलांचा 'जोखड' धडा आठवतोय का? आणि
ज्ञानेश्वरांची सुरेख उपमा असलेली एक कविता १० वीला होती. ज्ञानेश्वरांची कविता बहुतेक श्रीकृष्णरावो जेथ तेथ लक्ष्मी अशी काहितरी होती. त्यात शभु तेथ अंबिका, चद्र तेथ चांदणे कहिसे शब्द होते.

चंद्र तेथे चंद्रिका| शंभू तेथे अंबिका|
संत तेथे विवेका| असणे की जे||

अजून एका कवितेच फक्त नाव आठवतंय  'केल्याने देशाटन'
--
आपेश मरणाहुनी वोखटे
आप  मेला  जग  बुडाला
जसे भाड्बुन्जे लाह्या  भाजतात
जसा विद्युल्लतापात होतो
असं पानिपतच्या लढाईच वर्णन त्यात होत.भाऊसाहेबांच्या बखारीतला हा उतारा होता.

चीमण्यानो परत या  - लेखक माहिती नाही बहुतेक गंगाधर गाडगीळ
--
Dr पूर्णपात्रे यांचा एक धडा होता त्यांच्याकडे ३ चावे असतात सिहाचे रुपाली, XXX आणि सोनाली
सोनालीचे केस सोनेरी असतात आणि रुपाली दिसायला फार सुंदर असते. सोनाली ला खिमा आवडायचा. पण एक दिवस घरातले कोणी एक अण्णा नामक व्यक्तीवर रुपाली हल्ला करते आणि त्यांचा हात-पाय चावते. पण नंतर आपली चूक समजून शांतपणे बसून राहते. पण या घटनेनंतर लेखक रूपालीला प्राणी संग्रहालयात सोडतात पण त्यामुळे सोनाली खाण पिण बंद करते म्हणून शेवटी लेखक सोनालीला पण झू मध्ये सोडून येतात. बहुतेक हे झू म्हणजे पेशवे पार्क. सुरवातीला दोन्ही बछडे दूध भात खातात तेव्हाच एक वाक्य मजेशीर वाटायचं लेखक म्हणतात " दूध भात खाणारे हे जगातील एकमेव सिंह असतील"


इयत्ता १०

P L देशपांडे यांचा उपास हा धडा होता.
G.A. कुलकर्णीचा  अश्वथामाचा  धडा  - भेट -अश्वथामा  आणि  सिद्धार्थ  (बुद्ध  न  झालेला ) - "घाबरू  नकोस  गौतमा  मी  अश्वत्थामा  आहे" हे धीरगंभीर वाक्य आठवत. त्यात शेवटी अश्वत्थामा गौतमला म्हणतो कि 'आयुष्याच्या शेवटी मृत्यू आहे म्हणूनच जीवन आकर्षक आहे'. मला हे वाक्य आठवत होत पण नेमक कुठल्या धड्यातल हे लक्षत नव्हत. अगदी परवाच 'विहीर' चित्रपट पाहत होतो त्यात आपल्या श्री. वा. कुलकर्णी सर वर्गात शिकवत असतानाचा प्रसंग आहे. योगायोग असं कि सर नेमक हेच वाक्य मुलांना समजावून सांगतानाचा हा प्रसंग आहे त्यावरून मला उलगडा झाला कि हे वाक्य नेमक कुठल्या धड्यात वाचल होत :)

कोकणातले दिवस - रवींद्र पिंगे

गोमटेश्वर - भरत विरुद्ध बाहुबली अशी लढत होते. भारताचा अश्वमेध बाहुबली आडवतो आणि युद्ध अटळ होत. पण मग एवढे सैनिक मरण्यापेक्षा द्वंद्व खेळायचं ठरत अनु त्यामध्ये जो जिंकेल त्याने राज्य करायचं आणि दुसर्याने वनवासात निघून जायच असं ठरत. नेत्र पल्लव कुस्ती अशी २-३ प्रकारची द्वंद्व होतात बाहुबली उंच असतो आणि भरताला त्याच्याकडे मान वर करून बघव लागत, त्यातून सूर्याची किरण थेट त्याच्या डोळ्यात जातात आणि त्याची पापणी लावते त्यामुळे पहिले द्वंद्व तो हरतो आणि अंतिम मुष्टियुद्ध / कुस्तीतपण बाहुबली त्याला भारी ठरतो. बाहुबलीची प्रचंड मूर्ती आणि त्यावरचा शिलालेख shri Chamundaraye karawiyale,  agaraye suttale करवियले


बालिश बायकात बहु बडबडला - मोरोपंत
माझ्या आठवणीप्रमाणे पांडव अज्ञातवासात असताना ज्या राजाकडे राहत असतात त्याचा राजपुत्र उत्तर हा उच्च्रुंखल असतो आणि बालिशपणे आपली स्तुती राज्स्त्रीयांमध्ये करत असतो. पण जेव्हा कौरव हल्ला करतात तेव्हा तो घाबरतो असा काहीसा आशय होता त्या कवितेचा.


आणि  बुद्ध  हसले  हा  धडा  -- लेखक  यदुनाथ  थत्ते  / राजा  मंगळवेढेकर
- काही  लोक  एका खोलीमध्ये  अस्वस्थपणे येरझारा  घालत  असतात  आणि  तेवढ्यात  फोनची  घंटी  वाजते  आणि  पलीकडून  परवलीचा  शब्द  ऐकू  येतो - आणि बुद्ध हसले. भारताने पोखरण येथे जो पहिला अणुस्फोट केला त्यावर हा धडा आधारित होता

केल्याने  देशाटन हा धडा म्हणजे फक्त नाव लक्षात आहे :) पण पुढच अजिबात आठवत नाही

3री ला वसा नावाचा एक धडा होता: भाऊ बहिणीला टाळट असतो कारण ती गरीब असते. ती लग्नाला जाते तर भाऊ लक्षच देत नाही आणि जेवत असताना तिचा अपमान करून तिला हाकलून देतो. बहिणीला वाईट वाटत. पण एक वयस्कर बाई तिला धीर देते आणि सांगते आळस झटकून कामाला लाग . घेतला वसा टाकू नको..अस म्हणून बहीण कामाला लागते..कष्ट करते आणि पैसे मिळवते. भावाला समजत आणि मग तो तिला लगेच जेवायला बोलवतो. जेवायला बसाल्यावर बहीण एकेक पकवांनाचा घास एकेका दगिन्यावर ठेवेते. भाऊ विचारतो तेव्हा म्हणते तू ज्याना जेवायला बोलवल आहेस त्याना  भरवते. उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका अशी पंच लाईन होती

आणि  पाडवा  गोड  झाला  -- हा  धड्याचा  संदर्भ  मिळाला  पण  काही केल्या  आठवत  नाहीये . गोष्ट  अशी  आहे  म्हणे  कि  एक  गरीब  कुटुंब  असते  रोजच्या  मोलमजुरीतून  कुटुंबाचा  उदरनिर्वाह  चालत  असतो .पाडवा  येतो  तर  ऐई  बाबांना  वाटत  कि  काहीतरी गोड  धोड  कराव,  पण ऐपत  नसते . घरातल्या  थोरल्या   मुलीला  हे  समजते. पाडव्याच्या  दिवशी  ती  एक  डबा आणते त्यामध्ये गोल-गोल  भाकरीचे  लाडू  असतात . हे  लाडू  तिने  रोजच्या  पानातल्या  उरलेल्या  भाकरीच्या  तुकड्यांपासून  केलेले  असतात .

वर  मी  लिहिल्याप्रमाणे  अजून एका धड्याच नाव आठवत  नाही. ३  मुल  असतात  त्यांना  १०  रुपये  मिळतात . पहिला  मुलगा  खोलीभर  गवत  आणतो, तर  दुसरा  मुलगा  गोळ्या  बिस्किटांमध्ये  उडवतो, तिसरा  मुलगा  त्या  पैशातून  गांधीजींचा  फोटो , अगरबत्त्या  आणि  फुल  घेऊन  येतो . त्यानंतर  फोटोची  पूजा  करतो  etc.

बोलावणे  आल्याशिवाय  नाही  हा आचार्य अत्रे यांचा धडा. बालभारतीच्या पुस्तकामाध्ल कार्टून मला नक्की   आठवतंय.  एक  मुलगा  हट्टीपणे  उभा  आहे अशा आशयाच ते चित्र होत

हिरवे हिरवे गार गालीचे - हरित  तृणंच्या मखमलीचे  ,
 त्या सुंदर मखमलीवरती - फुलरणिहि खेळत होती.
गोड निळ्या  वातावरणात- अव्याज मने होती डोलात,
 प्रणायचंचल त्या भ्रूलिला - अवगत नवत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनि - झोके घ्यावे, गावी  ई,
 याहुनी ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला?
पुरा विनोदी संध्यावात - डोल डोलवी हिरवे शेत,
 तोच एकदा हसत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनूकली ती - कुणकडे गा पाहत होती?
 कोण बरे त्या संध्येतुन - हळूच पाहते डोकवून?
तो रविकर का गोजिरवणा - आवडला आमुच्या राणीला?"
 लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी.
स्वरभूमीचा जुळवित हात - नाच नाचतो प्रभातवात,
 खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागती लपवायला
आकाशीची गंभीर शांती - मंद मंद ए अवनिवरति,
 वीरू लागले सौन्शय-जल - संपत ये विराहाचा काळ,
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊनी - हर्षानिरभारा नटली अवनी,
 स्वप्न संगमी रंगत होती - तरीही अजुनी फुलराणी ती.
तेजोमय नव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशाला,
 जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्‍हाडी गा ई येती.
 लाल सुवर्णी झगे घलुनी - हसत हसत आले कोणि,
 कुणि बांधीला गुलाबी फेटा - झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चांदोल चालला - हा वांग्ञिश्चय करावायला,
 हे थटाचे लग्न कुणाचे? - साध्या भोळ्या फुलराणीचे.
गाउ लागले मंगल पाठ - सृष्टीचे  अरे भट,
 वाजवी सनाई मारुत राणा - कोकीळ घे ताना वर ताना,
नाचू लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पखवाज,
 नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर,
लग्न लागले सावध सारे - सावध पक्षी सावध वारे,
 दवामाया हा अंत:पट फिटला - भेटे रविकर  फुलराणीला. .
------------

भा.रा.तांबे: जन  पळभर  म्हणतील  हाय  हाय (9th or 10th)
जन पळभर म्हणतील  हाय  हाय
मी  जाता  राहिले  कार्य  काय
सूर्य  तळपतील  चंद्र  झळकतील
तारे  आपुला  क्रम  आचारातील
असेच  वारे  पुढे  वाहतील
होईल  काही  का  अंतराय

हे  एक  मृत्युगीत  होत श्री तांबे याचं. भा  रा  तांबे  हे  बरेच  आजारी  होते  आणि  जगण्याची  अशा  त्यांनी  सोडली  होती  त्यावेळी  लिहिलेली  हि  कविता  आहे

कार  पहावी  घेऊन  - ची  वी  जोशी  यांचा  धडा  अफलातून  होता.

आचार्य  अत्रे  यांचे  2 धडे  आठवतात ...एक  विनोद  कसा  असावा.  ज्यामध्ये  विनिओदचे  प्रकार  दिले  होते. टवाळा  आवडे  विनोद  या  समर्थांच्या  श्लोकाच  विवेचन  केल  होत. आमचे श्री वा कुलकर्णी यांनी त्याचा अर्थ आम्हाला नेमका सजून सागितला होता.

अत्र्यांचा  अजून  एक  धडा  म्हणजे  : जीवन मृत्यूवर  होता.

अजून  एक  धडा  आठवतोय अत्रे किंवा पूल यांचा होता  ज्यामध्ये  लेखकाने  लोणावळा  का  खंडाळा येथील  बंगल्यात  राहत  असतात  आणि  तिथल्याच  एका  अत्यंत  सुंदर  पहाटेच  वर्णन  केल  होत . झुंजूमुंजू  झाल होतं अस एक  वाक्य  आठवतंय  अजून  कारण  पहिल्यांदा  हा  शब्द  वाचनात  आला  होता आणि धड्याच्या शेवटी या शब्दाचा अर्थही दिला होता. हा  धडा  'माझे  सोबती ' तर  नव्हे ना?  कारण  माझे  सोबती  या  धड्यामध्ये  p l देशपांडे  यांनी  त्यंच्या  खंडाळ्याच्या   बंगल्याचे  वर्णन  केले  होते.

३रि ला  सुगीचे  दिवस  हा  धडा  होता. शेतात  काम  करणाऱ्या  लोकांच  चित्र  होत  आणि  बहुतेक  हुरड्याच  संदर्भ  होता  त्यात .

अजून एक  धडा  म्हणजे  प्रकश  प्रकाश: लेखक  नाही  स्वतः एका  circus चा रिंगमास्तर  असतो. Circus चा  प्रयोग  चालू  असतो  आणि  जेव्हा light  जातात त्यावेळी लेखक वाघ सिव्हांचे खेळ दाखवत असतो. तर मग   प्रत्येक  प्रेक्षक  एकेक  करून  काडी  पेटवतो आणि  प्रकाशने  circusचा  तंबू  उजळून  निघतो.

शांताबाई  शेळके  यांची  एक  कविता  मिळाली कवितेच नाव होत 'गवतफुला'
रंग  रंगुल्या  सं  सानुल्या  गावात  फुला रे  गावात  फुला
असा  कसा  रे  मला  लागला  सांगा  तुझारे  तुझा  लाल
मित्रांसंगे  माळावरती  पतंग  उडवीत  फिरताना
तुला  पहिले  गावात  वरती  डुलता  डुलता  झुलताना
विसरुन  गेलो  पतंग  नाभीच  अ  विसरून  गेलो  मित्रांना
पुना  तुजला  हरखुन  गेलो  अशा  तुझ्या  रे  रंग  कला
हिरवी  नाजूक  रेशीम  पती  दोन  बाजूला  सालासालती
नीला  निलुली  एक  पाकळी  पराग  पिवळे  झाकामाकती
ताली  पुन्हा  अन  गोजिरवाणी  लाल  पाकळी  खुलती  रे
उन्हामध्ये  हे  रंग  पहाता  भान  हरपुनी  गेले  रे
पहाटवेळी  आभाळा  येते  लहान  होऊन  तुझ्याहुनी
निळ्या  कारणी  तुला  भरविते  दावा  मोत्याची  कानिकाणी
वर  घेऊन  रूप  सानुले  खेळ  खेळतो  झोपला
रात्रही  इवली  होऊन  म्हणते  अंगीचे  गीत तुला .
मलाही  वाटे  लहान  होऊन  तुझ्याहुनीही  लहान  रे
तुझ्या  संगती  सदा  राहावे  विसरुनी  शाळा  घर  सारे
तुझी  गोजिरी  शिकून  भाषा  गोष्टी  तुजला  सांगाव्या
तुझे  शिकावे  खेळ  आणखी  जादू  तुजला  शिकवाव्या
आभाळाशी  हत्त  करावा  खाउ  खावा  तुझ्यासवे
तुझे घालूनी  रंगीत  कपडे  फुला  पाखरा  फासाच्वावे
रंग  रंगुल्या  सं  सानुल्या  गावात  फुला  रे  गावात  फुला
असा  कसा  रे  मला  लागला सांगा  तुझा  रे  तुझा  लाल

हिरकणी चा  धडा  आणि  चित्र  आठवत  आहे  मला
पाठ  २८
कुणासाठी ? ... बाळासाठी !
प्रश्न  आणि  उत्तरे  -
रायगडावर  जायला  हीराला  उशीर  का झाला ?
उत्तर - हिराचे  बाळ  अद्याप  झोपले  नव्हते  आणि  बाळ  झोपाल्यावारच  तिला  बाहेर  पडणे  शक्य  होते  कारण, घरात  इतर  कुणीही  बाळाची  देखरेख  करायला  नव्हत शिवाय  कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी  तिला  डोक्यावर  दुधाच्या  चरव्या  घेऊन  बाळाला  घेणे  शक्य  नव्हते. बाळाला  झोप  लागेपर्यंत  ती  घरीच  थांबली  आणि  गडावर  जायला  तिला  उशीर  झाला.
2)दिवस  मावाळल्यानंतर  तिला  कशाचे  भीती  वाटली ?
उत्तर  - गडाचे दरावाचे  बंद  झाले  असावेत  आणि  आपले  बाळ  रडत  असेल  ह्याची  तिला  भीती  वाटली .
3)ती  चौकीदाराकडे  का  गेली ?
उत्तर  - ती  चौकीदाराकडे  गेली  कारण, गडाचे  दरवाजे  बंद  झाले  होते  आणि  तिचे  बाळ  घरी  एकटेच  होते  म्हणून  बाळाच्या  जाणीवेने  ती  चौकीदाराकडे  गडाचे  दरवाजे  उघडण्याची  विनंती  करण्यासाठी  गेली .
4)गड  उतरण्यासाठी  तिने  काय  केले ?
उत्तर - गड  उतरण्यासाठी  तिने  गडाच्या  भोवती  फिरून  कुठून  गडाचे  तात  पार  करून  आता  शिरता  येईल  का  असा  विचार  केला . नंतर  एका  बुरुजावरून  ती  गडाचे  तट उतरून  खाली  पोहचली .
5)शिवाजी  महाराजांनी  तिचे  कौतुक का केले ?
उत्तर  - एक  स्त्री  असूनही  असा  गडाचे  तट  उतरून  आपल्या  बाळाला  भेटीसाठी  तिने  जी  कसरत  केली  तो  शूरपणा  पाहून  महाराज  अतिशय  प्रसन्न झाले  आणि  त्यांनी  हीराला  बक्षीस  देऊन  तिचे  कौतुक  केले.
6)'हिरकणीचा बुरूज' असे  नाव  का  पडले?
उत्तर  - कारण  तो  बुरूज  चढून  हिराने  गडच तट  पार  केले  होते  व गडाच्या  आत  शिरली  होती. त्यामुळे  तिच्या  ह्या  शौर्याबद्दल  त्या  बुरुजाचे  नाव  'हिरकणीचा  बुरुज ' असे  पडले .
----------------~~~~~X~~~~~~----------------
अजून  एक  कविता  समाधी  नावाची . माझ्यामते  ८वित  असतात्ना  होती  आपल्याला. कुमारभारतीच्या  शेवटच्या  पानावर  एका  पडझड  झालेल्या  सामाधीच चित्र होत.
हा  भूमीचा  भाग  आहे  अभागी
इथे  आहे  एक  समाधी  जुनी
विध्वन्सली  संध्याकाळ ..मध्ये  ती ..तिच्या  या  पहा  जागोजागी  खुणा

ह्या  दूर  दूरच्या  ओसाड  जागी
किडे  पाखरावीन  नाही  कुणी
कोठून  ताजी  फुले  बाभळी
हिला  वाहिले  फक्त  काटे  कुटे
हि  भंगलेली  शलाका  पुराणी
कुणाचे  तरी  नाव आहे  इथे

रानातला उन  मंदावलेला
उदासीन  वारा  इथे  वाहतो
फांदितला  कावळा  कावलेला
भूकेलेलाच  इथे  तिथे  पाहतो
---------

sonyachi जांभळे - एक मात्रिक असतो आणि एक सोनार असा काहीतरी होत. हा धडा कधी होतं ए नाही आठवत

विदुषकावर एक धडा होता. त्याच्या हट्टापायी राजा त्याला रात्री पहार्यावर ठेवेतो. पण याला झोप लागते. राजा हळूच त्याची तलवार काढून घेतो आणि त्या जागी लाकडाची तलवार ठेवेतो. दुसर्या दिवशी दरबारात राजा विदुषकाला विचारतो कि पहारा कसा झाला. विदुषक म्हणतो चागला झाला तसा राजा विचारतो कि तूला झोप नही लागली ? तर विदुषक म्हणतो 'छे छे अजिबात नाही. मी पहार्यावर झोपलो असेन तर माझी तलवार लाकडाची होईल असा म्हणून म्यानातून तलवार बाहेर काढतो आणि संपूर्ण दरबार हसायला लागतो.


झोप नावाचा एक धडा होता. कोण्या एका पांडू तात्यांना फारच झोप येत असे. प्रवास करता करता ४ स्टेशन पुढे जायचे मग ३ मागे असा करत करत पोचायचे त्या धड्याच्या शेवटी एक वाक्य होत "पण पळत पळत झोप काढताना पांडू तात्यांना काही अजून कोणी बघितलेलं नाही"


 इयत्ता ७वि ची एक कविता
गतकाळाची होळी झाली धारा उद्याची उंच गुढी
पुरण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी
हि वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजावरती पणजोबांचे भूत वसो


सागर आवडती मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या या जळात केशर सायंकाळी मिळे
मऊ मऊ रेतीत म्व खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती
तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने  दूर उभा राहतो

क्षितिजावरि ??? दिसती ??? गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते


दूर टेकडीवरी पेटती निळे ताम्बाडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे


प्रकाशदाता जातो जेवा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

------
इयत्ता ७वि
..झाडांच्या पानावरती हळद  उन्हाची  सळसळते

इयत्ता ९ वी 
ऋणानुबंध  कविता ; लेखकाची बदलीची  नोकरी  असते  त्यामुळे त्याला  दुख  असतं  कि  कोणत्याच गावाशी ऋणानुबंध  कधीच  जुळले  नाहीत 

इयता १०वि नवेगाव बंध पक्षि  अभयारण्यातला  मारुती  चितमपल्ली यांचा नितांत सुंदर असा तो धडा. माधवराव  पाटील  यांच्यासोबत  फिरतानाचे  अनुभव  होते  त्यात . त्यातल एका  प्रसंगच  वर्ण  फारचं छान  होत. एक  सापाची  मादी  धोका  ओळखून  आपली  पिल्ले  पटापट  आपल्या  जबड्यात  ढकलते  आणि  धोका  गेल्यावर  परत  त्यांना  बाहेर  काढते . हा  दुर्मिळ प्रसंग  माधव  पाटील  यांनी  पाहिलेला  असतो याची आठवण मारुती चितमपल्ली करून देतात.

वळीव  हा  धडा ८वि मध्ये असावा. एक  शेतकरी  असतो  आणि  भयंकर  उन्हाने  'काहीली'  झालेली  असते . काहिली  हा  शब्द पहिल्यांदा  वाचनात आला. मला  वाटत  कि  उन  मी  म्हणत  होत  का  सूर्य  आग  ओकत  होता  हा  शब्दप्रयोग  सुधा  प्रथमच  वाचनात आलेला.

याच वर्षी. सुनील गावास्कास यांनी लिहिलेला एक धडा होतं. बर्फ घातलेलं पाणी पिताना एक लहानसा बर्फाचा तुकडा नेमका दाताच्या पोकळीत जाऊन बसतो आणि काही केल्या तो बाहेर काढता येत नाही. शेवटी तो वितळून जाईपर्यंत वाट पाहवी लागते. पण त्यानंतर दातामधून प्रचंड कळा येऊ लागतात आणि तशातच गावस्कर यांना बात्तिंग ळा उररव लागत. कळा असह्य होऊन देखील काळा एकाग्रतेने west  indies मधल्या भल्या भल्या bowlers समोर गावस्कर उभे राहतात आणि शतक काढतात. नाबाद शतक ठोकून परत pavelian मध्ये आल्यावर सहकार्यांच्या विनोदांवर हसण्याचीही शक्ती उरलेली नसते त्यांच्यात. हे शतक त्यांनी झळकावलेल्या बाकी शतन्पेक्षा त्यांना सर्वात महत्वाच वाटत.

७वि  ला  अजून एक धडा  म्हणजे  चिमण्या ..दुपारची  वेळ आणि  लेखकाला  बांधाच्या  बाजूने  एकदम  गलका आईकू  येतो . जाऊन  बघतो  तर  तिथे  सापाने  एका  चिमणीला  पकडलेला  असता  आणि  तोंडात  पकडून  तो  घेऊन  जात  असतो . चिमण्या  मग  त्याच्यावर  हल्ला  चढवतात . त्याच्या  डोक्याप्सून  शेपटीपर्यंत  त्याला  चोचीने  मारतात . शेवटी  साप  तोंडात  पकडलेली  चिमणी  थुंकून टाकतो

इयता ७वि - ८वि भूमिगत हा धडा
भूमिगत  ह्या  धड्यात  एक  क्रांतिवीर  भूमिगत  होऊन  आपल्या  मुस्लीम  मित्राकडे  आसरा  घेतो  आणि  बरेच  महिने  राहतो . पुढे  आणीबाणीचे  वातावर  निवलाल्यावर  सर्व  भूमिगताना  रांगेत  उभे  केलेले असते  तेव्हा  मुस्लीम  मित्र  त्यच्या  बायकोला  विचारतो  कि  संग  बर  यातला  कोणता  क्रांतिवीर  आपल्याकडे  राहिले  होता  तर  तिला  ते  सांगता  येत  नाही  कारण  तिने  त्यचा  चेहराही  पाहिलेला  नसतो . घरात  अजून  कोणी  नसताना  मित्राला  आश्रय  देण्यामागे  जो  पराकोटीचा  विश्वास  आणि  देख्भाक्ती  दाखवली त्याच  वर्णन  होत .
----------------------------------------------
4 थीला  आम्रतरू  नावाची  एक  कविता  फार  फार  पुसटशी  अतःवत  आहे.
कविता  अशी  आहे  ..
आम्रतरू  हा धरी  शिरावर  प्रेमळ  नीज  साउली 
मृदुल  कोवळी  शमल  हिरवळ  पसरे  पायांतली 
आणिक  पुढती  झरा खळाळत  खडकातून  चालला 
सध्या  भोळ्या  गीता  मध्ये  अपुल्या  नित  रंगला 
काठी  त्यांच्या  निळी  लव्हाळी 
डुलती  त्यांचे  तुरे 
तृणानकुरांवर  इवलाली  हि  उडती  फुलपाखरे 
खडा  पहारा  करती  भवती  निळे  भुरे  डोंगर 
अगाध  सुंदर  भव्य  शोभते  माथ्यावर  अंबर 
------------
"क्रियेवीण  वाचाळता  व्यर्थ  आहे" हि समर्थ  रामदास  यांची  कविता  होती. 
यत्नाचा  लोक  भाग्याचा  यत्ने  विन  दरिद्रता 
उमजला  लोक  तो  झाला  उमजेना  तो  हरवला 
केल्याने  होत  आहे  रे  आधी  केलेची  पाहिजे 
यत्न  तो  देव  जाणावा  अंतरी  घारिता  बरे 

जो  दुसर्यावाई  विसंबला  त्याचा  कार्यभाग  बुडाला 
जो  आपणाची  कास्थित  गेला  तोची  भला 
------------
एक  धडा/गोष्ट आठवते 
एक  मुलगा  आजारी  असतो  आणि त्याला  भेटायला  त्याचे  मित्र  येतात 
कोणी  गण  गातो  तर  कोणी  बासरी  वाजवतो . एक  जन  त्याला  सुंदर  मोरच  पीस  बेहत  म्हणून  देतो . शेवटी  मला  वाटत  कि  वर्गातले सर /गुरुजी  सुद्धा  भेटायल  येतात  त्याला . मला  आठवतंय  कि  वर्गात  कोणी  आजारी  पडला  तर  मला  वाटायचं  कि  याला  जाऊन  अपण  मोरच  पीस  द्याव  किंवा  कमीतकमी  सिराणी  त्यला  भेटायला  जावा :) मी  स्वतः  आजारी  पडलो  तरी  मला  फार  फार  वाटायचं  कि  सर  किव्न  बी  घरी  याव्यात  

---------
६वि - ७वि  त  एक  जबरदस्त  धडा  म्हणजे  तो  वाघाच्न्हा  'सुन्दार्बानातली  वाघांची  सभा '. त्यात माणसे  पैसे  खातात  असा  काही  एक  संदर्भ  होता . एक  वाघ  मग  वेश  बदलून  शहरात  जातो  असा  काहीतरी होत
---
७वि  तला  सर्वात  भन्नाट  धडा  म्हणजे  खेळखंडोबा. टायटल आणि कार्टूनच  मुळी  अप्रतिम  होत . माकड  इकडे  तिकडे  उद्या  मारत  आहेत  आणि  गावातले  लोक  पळापळ  करत  आहेत . धडा  असा  होता  कि  गावातल्या  गाढवांची  शिरगणती  करण्यची नोटीस  येते. पण  नोतीसिमध्ये  donkey ऐवजी  mmonkey  झालेलं  असत  आणि  मग  चावडीवर  सभा  होते  कि  माकड  कशी  मोजायची . मग  अस  ठरत  कि  मोजणी  झाल्यावर  प्रत्येक  माकडाच्या अंगावर रंगाची  पीचकरी  मारायची. पण मग  माकडच  पिचकार्या  पळवतात  आणि  एकाच  गोंधळ  होतो . शिरगणती  हा  शब्द  पहिल्यांदा  समजल  होता  तेव्हा
--------
धोंडो  केशव  कर्वे  (केशवसुत) यांचा  एक  धडा  होता . त्यांना  आणि  त्यांच्या  मित्राला  परिक्ष  द्यायला  दुसर्या  गावी  कायचे  असते  पान  रात्र  होते  वाटेत  आणि घाटाचा  रस्ता  असतो . धडा  वाचून  उगीच मला वाटायचं कि  आपल  गाव  पान  सच  लांब   असायला  हवा  होत  आणि  मग  आपण  पण खूप  खूप  कष्ट  करून  तिथे  गेलो  असतो वगैरे वगैरे :)
----
शामचा  पोहण्याचा  धडा आठवतो . कमरेला  सुकड  बधून  पोहणाऱ्या  मुलाचा  reference होता. त्यावेळी  पहिल्यांदा सुकड  हा  शब्द  समजला .शाम घाबरत  असतो  आणि  मग  लपून  बसतो पण शेवटी  पोहरा बांधून   शिकतो 
---
जयप्रकाश  नारायण  याचं  चित्र  असलेला धडा आणि त्यावर जयप्रकाश याचं प्रसन्न हास्य असणार चित्र. मला वाटत कि इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीवर हा धडा असावा
------
याच वर्षी पानशेत च्या पुराने पुण्यात जो हाहाकार मजला होता त्या १९६१ सालच्या दिवशीच वर्णन होत. पुराच्या दुसर्या दिवशी शहराची भयानक स्थितीच वर्ण लेखकाने केल होत. सर्वत्र पाणी पण वर डोक्यावर निरभ्र आकाश अशा विरोधाभासाच वर्णन लेखकाने केल होत.

वात्सल्य  हा  धडा  फार  सुन्दर होता. वाड्यातल्या  गायीला  कालवड  झालेली  असते . मग  लहानगा  मुलगा  (लेखक ) 'अंगरख्याला  तोंड  पुसत' गोठ्यात  जातो  तर तिथे  त्याचे  बाकीचे  मित्र   अगोदरच  आलेले असतात . एके दिवशी चरून  परत  येताना  गायीची  आणि  वासराची  ताटातूट  होते . गाय  फार  फार  अस्वस्थ  होते . ती एकसारखी हम्बरत असते  आणि  "कासा तटाटलेला होता" हे  वाक्य लक्षात राहायचं. नंतर  वासरू  येत  आणि वासराला पाहून  गायीच्या पान्ह्यातून  दूध  वाहू  लागत .
-----
"बाळू  गुंडू गिलबिले " या  मुलाच्या  हाताला  बोटे  नसतात. मग  तो  पायाने  चित्रे  काढतो .त्या  धड्यात  त्याने  काढलेल्या  काही  भेट  कार्ड होती . मला  अजून  आठवतंय  कि  ते  पाहून  आम्ही  घरी  जाऊन  हाताने  चित्र  काढून  भेटकार्ड  बनवायचा  प्रयत्न  करत  असू 
----
जावईबापू  नावाचा  धडा आवडायचा. मला आठवतंय  कि  कोणी  एक  जावईबापू  नाटक  बघायला  जातात  आणि  तिथे  भीम-बकासुर का भीम - कीचक  अशी  कुस्ती चालू  असते . जावईबापूना  ते  आवडत  नाही म्हणून ते  स्वतः  stage वर जातात  आणि दोघांना  मारतात.
एक बहूतेक किचक वधाचे नाटक पण होते. त्यात किचकाने द्रौपदीला हात लावल्यावर एक प्रेक्षक सरळ रंगमंचावर जातो आणि त्याला जाम बदडतो
---
गोपाळ  कृष्ण गोखले यांची एक गोष्ट होती.  वर्गात  गुरुजी गणित  शिकवीत  असतात .मग  एक  गणित  सोडवायला  देऊन  गुरुजी बाहेर  जातात .परत  येऊन  विचारतात  गणित  कुणी  कुणी  सोडवले . गुरुजी  एकेकाजवळ  येऊन  तपासू  लागतात . अवघड  गणित  कुणालाच  सोडवता  आलेलं  नसते . गुरुजी गोपालाजवळ  येतात  व गणित  पाहू  लागतात . त्याने गणित  अचूक  सोडवलेल  असते .गुरुजी  म्हणतात  शाबास  गोपाळ . तू  गणित  अचूक  सोडवाल  आहेस .  वर्गाला  उद्देशून  गुरुजी सांगतात  कि  पाहिलत  गोपाळने  गणित  अगदी  बरोबर  सोडवाल  आहे  शाबास  गोपाल . गुरुजी  त्याची  पाठ  थोपटतात  वर्गातील  सगळे  टाळ्या वाजवतात पण गोपाळ  मात्र  तसाच  उभा  असतो . गुरुजींच  त्याच्याकडे  लक्ष  जात  तर  त्याच्या  लक्षात  येते  कि  गोपालाच  डोळे  भरून  आले  आहेत  आणि  तो  रडकुंडीला  आला  आहे . गुरुजी   त्याच्याजवळ  जातात  आणि  विचारतात  'गोपाळ  काय  झाले? '  आवरून  धरलेला  हुंदका  फुटून  गोपाळ  रडू  लागतो . गुरुजीना  कळेना  के  गोपाळ ला रडायला  काय  झाले . सगळा  वर्ग  चिडीचूप  होतो . गुरुजी  विचारता  कि  गोपाल  तू  का  रडतो  आहेस . गोपालला  आनाखीनाक h हुंदका  येउऊ  लागतात. "गुरुजी  मला  शाबासकि   नको " कसाबसा  गोपाल  उद्गारतो  आणि  हुमसून  हुमसून  तो  आणखीनच  रडू  लागतो . गुरुजी  म्हणतात  शाबासकी  का  नको  गोपाळ ? वर्गात  कुणालाच  सोडवता  न  आलेलं  गणित  तू  अचूक  सोडवलेस  आणि  म्हणून  मी  तुला  शाबासाके  दिली ' गोपाल  शेवटी  कसाबस  सांगतो  कि  'गुरुजी  ते  गणित  मी  स्वतः  सोडवल  नव्हते . ते वरच्या वर्गातील  मुलाकडून  सोडवून  घेतलं  होते  म्हणून   मला  शाबासाकि नको .हा  छोटा  गोपाळ  म्हणजेच  गोपाळ  कृष्ण गोखले  होत.
----
अजून  एक  धडा  म्हणजे  स्वाभिमान  नावाचा बहुतेक . ब्रिटीशांच  काल  असतो  आणि  भारत  अजून  स्वतंत्र  व्हायचा  असतो . लेखकाचे principal कुठ्ल्यातरी  कारणावरून  लेखक  आणि  बाकीच्यांना  शिक्ष  करतात. बहुतेक  वंदे  मातरम  म्हणण्यावरून  शिक्ष  होते . सगळ्यांना  हातावर  सपासप  छड्या बसतात. लेखकाची  वेळ  येते  तेवा  लेखक  प्रीन्चीपाल  ना  विचारतो  'पण स्वाभिमान  दाखवण  चूक  आहे  का ?' आणि  त्यांचं  हातातली  चढी  गळून  पडते 
---
दगड  शोधूया   नावाचा  एक  धडा  होता . लेखकाला  वेगवेगळ्या  आकाराच्या  दगड  जमवायचा  चंद . त्याच्याकडे  बरेच  दगड  असतात  वेगवेगळे . त्यापासून त्याला  कुत्रा  बनवायचा   असतो  पान  काही  केल्या  त्याला  कुत्र्याच्या  डोक्याच्या  आकाराचा  दगड  मिळत  नसतो . एकदा  असाच  कुठेतरी  फिरत  असताना  त्याला  अचानक  तसा  दगड  मिळून  जातो .
---
मोटार  पहावी  घेऊन हा चिमणरावांवर धडा होता  . मोटार  चालू  तर  होते  पान  काही  केल्या  बंदच  होतो  नाही  मग  पेट्रोल  संपेपर्यंत  गोल  गोल  चकरा  माराव्या  लागतात . तेव्हा  चीमणरावांची   म्हातारी  आई  त्यांना  म्हणते  'अरे चिमण गणपतीला  प्रदक्षिणा  घालणार  म्हणाले  होते  पण  ते  गाडीत  बसून  नवे  रे '
...लेखक  अर्थातच  ची  वी  जोशी 
----
कविता निर्धार 
जोर मनगटातला  पुरा  घाल  खर्ची 
हाण  टोमणा  चल  ना  जरा अचूक  मार  बरची 
दे  टोले जोवरी  असे  तप्त  लाल  लोखंड  
येईल  आकारास  कसे   झाल्यावर  ते  थंड 
उंच  घाट  चाढूनिया   जाणे  अवघड  फार 
परी  धीर  मनी  धरुनिया  ना  हो  कधी  बेजार 
झटणे  हे  या  जगण्याचे तत्व  मनी  तू  जाण
म्हणून  उद्यम  सोदुऊ  नको   जोवरी  देही  प्राण 
...केशवसुत 
-----
कविता 'जात  कोणती  पुसू  नका' 
जात  कोणती  पुसू  नका  
धर्म  कोणता  पुसू  नका  
उद्यानातील  फुलास  त्याचा 
रंग  कोणता  पुसू  नका 
हिरवा  चाफा  कमळ  निळे  
सुखद  सुमनांचे  गंधमळे  
एकच  माळी या  सर्वांचा  
नाव  त्याचे  पुसू  नका   
रहीम  दयाळू  तसाच  राम  
मशीद  मंदिर  मंगल  धाम  
जपून  शांततेचा  मंत्र  सुखाने  
एकादुजाला  दासू  नका 
---
कविता  'लढ म्हण'  .. कुसुमाग्रज 
ओळखलत  का  सर  मला  पावसात  आला  कोणी
कपडे होते  कर्दमलेले  केसावरती  पाणी
क्षणभर  बसला   नंतर  हसला   बोलला  वरती  पाहून  
गन्गामाई  पाहुणी  आली गेली घरट्यात  राहून     
माहेरवाशीण  पोरीसारखी  चार  भिंतीत  नाचली     
मोकळ्या  हाती  जाईल  कशी   बायको  मात्र  वाचली     
भिंत  खचली   चूल  विझली   होते  नव्हते  गेले 
प्रसाद  म्हणून  पापन्यान मध्ये  पाणी  थोडे  ठेवले
कारभारणीला  घेउन  संगे  सर  आता  लढतो  आहे  
पडकी  भिंत  बांधतो  आहे चीखलगाळ  काढतो  आहे 
खिशाकडे  हात  जाताच  हसत  हसत  उठला 
पैसे  नको  सर   जरा  एकटेपणा  वाटला 
मोडून  पडला  संसार  पण  मोडला  नाही  कणा 
पाठीवरती  हात  ठेवून  नुसते  'लढ' म्हणा 
---
दिनूच  बिल ..धडा  संपूर्ण आठवत नाही
---
जोखड  हा  धडा  किंवा  कविता  होती  पण  आठवत  नाही . नेट  वर  संदर्भ  इतकाच  मिळाला  कि  ती  रजिया  पटेल  यांनी  लिहिली  होती 
---
नारायण  सुर्वे  यांची  भाकरीचा  चंद्र  शोधण्यात  जिंदगी  बरबाद  झाली  या  आशयची  एक  कविता  आठवली . त्याच  अजून  एक  कारण  असं कि  जेव्हा  आपण  १० वी  ला  होतो तेव्हा कोणी  एक हातवळणे नावाचे  बहिण  भाऊ  मेरीट  मध्ये  आले  होते .  याउपर  त्यांनी  वेगवेगळ्या  प्रश्नांना  दिलेली  उत्तर  कशी  होती  याच  एक  पुस्तक प्रसिद्ध झाल  होत . त्यात  संदर्भासहित  स्पष्टीकरण  द्या  मध्ये  'भाकरीचा  चंद्राच हे  वाक्य  हमखास  असायचाच . त्यात  हातवळणे  भावंडानी  कुठून  तरी  एक  उर्दू  शेर  आणि  इंग्रजी  वाक्य  वापरल  होत  ते  अस होत   "मुद्दत  से  मंग  लिये  थे  चार  दिन  दो  कट गये आर्जुओमे दो  इंतजार मी" आणि   इंग्रजी  वाक्य  होत  "spontaneous Overflow  of  poerful  feelings" आम्ही  या  २ गोष्टीनी अत्यंत  'प्रभावित' वगैरे  झालो होतो  :)

---
स्मशानातली  प्रेत  उकरून  सोन  मिळवणाऱ्या  भीमा  पैलवानाची  गोष्ट होती
---
आनंद  यादव  यांचा  एक  धडा  होता  ज्यामध्ये  काहीतरी  पांजी  नावाच्या  वनस्पतीची  भाजी  करून  खायला  लागायची  कारण  घरची  गरिबी . बाप  फोकाने  मारायचा .....मग  कोणतरी  एकदा  दूरचे  नातलग  येतात  तर  त्यादिवशी  बरेच महिन्यानंतर गुळपोळी  करतात  असा  काहीतरी  विचित्र धडा  होता 
--
माधव  जुलिअन  याची  आई  नावाची  कविता  होती  १०वि  ला ..'आई' ..
आई  तुझ्या  वियोगे  ब्रह्मांड  आठवेगे ..
तेणे  चितच  चित्ती  माझ्या  अखंड  पेटे 

--

कविता 'अनामवीरा'
अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव
जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा
..कुसुमाग्रज
---
---
बहिणा बाईंची एक  कविता
मन  वाढाय  वाढाय
उभ्या  पीकातल  ढोर
त्यात  बहुतेक  तुकारामच्या  अभंगांचा  पण  एक  संदर्भ  होता  मन  करारे  प्रसन्न  सर्व  सिद्धींचे  ते  कारण
त्याच  प्रमाणे  अरे  संसार  संसार
जसा  तवा  चुल्ह्यावर
आधी  हाताला  चटके
मग  मिळते  भाकर
---
घाम  हवा  घाम  नावाचा एका धडा होता जो तेव्हा  कधीच  समजला  नाही  :)
---
एका धड्यात लेखकाने आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहील होत. लहान असताना वाचनाच्या वेडापायी वाचनालयात पहिल्या मजल्यावर अडकून पडला मग त्याने सुटकेसाठी खालच्या रस्त्यावरून जाणार्‍या लोकांकडे केलेली याचना आणी त्याला भेटलेले नमुनेदार लोक असे वर्णन असलेला धडा होता.
---
राजाचा जन्मदिन असतो. म्हणून आपल्याला काहीतरी घसघशीत भेट मिळेल या आशेनं भिकारी तिथं येतो. पण अनपेक्षीतपणे राजा त्याला विचारतो की "तू माझ्या जन्मदिनानिमित्त माझ्यासाठी काय भेट आणली आहेस?" तेव्हा तो भिकारी क्षणभर गडबडतो पण लगेचच पुढे येऊन राजाला ओंजळ पुढे करायला सांगतो. आणि आपली झोळी त्याच्या ओंजळीत रिती करायला लागतो. राजाची ओंजळ भरते आणि दाणे खाली सांडू लागतात. पण भिकारी ओततच राहतो. राजाला लाज वाटते.
---
'गे मायभू'
गे  मायभू  तुझे  मी  फेडीन  पांग  सारे
आणीन  आरतीला  हे  चंद्र  सूर्य  तारे
----
अत्तरांच वर्णन असलेला धडा होता ७वित
हा बाजार धडा बहुदा ना. सि. फडक्यांचा असावा असं वाटतय
त्यात विविध तर्‍हेच्या अत्तरांची वर्णनं आहेत. दुकानदार त्यांना हे जास्मिन घ्या वगैरे आग्रह करतो.
---
विसरभोळा गोकुळ नावाचा धडा कोणी सांगू शकेल का ? :)
---
मराठीत असे होते बहुतेक त्यात "अखेर सायकलने जिंकल" असा एक होता.
त्यात स्वातंत्र्य चळवळीत असलेल्या एका स्त्रीला तुरुंगातुन सोडवण्यासाठी तिच्या सहकार्‍यानी केलेली धडपड आणि शेवटच्या सायकलच्या प्रयत्नात आलेले यश असा गाभा होता त्याचा
----
एक  मुलगी  विहिरीवर  पाणी  भरायला  जाते  आणि  कळशी  पाण्याने  भरल्यावर  कळू  हळू  राहत  फिरवायला  सुरुवात  करते . इतक्यात  तिच्या  हातून  राहत  सुटतो  आणि  कालाशीच्या  वजनामुळे  जोरात  फिरू  लागतो  आणि  क्षनर्धत  हि  मुलगी  विहिरीत  पडते .  मग  कोणतरी  एक  दोर  सोडतो  आणि  त्या  दोराला  धरून  राहते  हि  मुलगे ..पण  बराच  वेळ  दोराला  धरल्यामुळे  हाल  काचतो  आणि  रक्त  येऊन  अटल  मांस  दिसायला  लागत . या  मुलीला  ग्लानी  यायला  लागत आणि  तेव्हढ्यात कोणातरी  पाण्यात  उडी  मारून  हिला  वाचावतो
---
मराठित सहावित लक्ष्मिबाइ रानड्यांच्या आत्मचरित्रातला भाग होता त्या बंगालि भाषा शिकल्या त्याच  वर्णन  होत
---
श्रावणमासी हर्ष  मानसी
हिरावळ दाटे चोहीकडे
क्षणात येती  सरसर  शिरवे
क्षणात फिरुनी  उन  पडे
..बालकवी


Sunday, July 17, 2011

ईश्वर आपल्या सर्वांच्या आत्म्यास शांती देओ !

पहाटे पहाटे service call आला होता आणि मग offshore मधल्या मित्रांची विचारपूस झाली त्यात असेच तास-दोन तास गेले. झोपून उठून चहासोबत इसकाळ वाचायला घेतला आणि अगदी थोड्याच वेळात मुंबई 3 स्फोटांनी हादरल्याची बातमी flash झाली. गेले काही वर्ष इतक्या गोष्टी बदलल्या पण 'बडे बडे शेहारोन्मे ये जो छोटी छोटी चीजे होती है' ते मात्र काही बदललेलं नाही. शब्दशः माझ्या पाचवीपासून देशाच्या पाचवीला पुजल्यासारखा काश्मीरचा हिंसाचार, मुंबैमधल gangwar, लोकलमधले accidents आणि 
मुंबईतले बॉम्बस्फोट सुरूच आहे अजून. किती दुर्दैवी देश आहे न आपला !!



मतांच्या राजकारणासाठी  आपल्याच देशाला नपुंसक बनवणारे हे राजकारणी हिजडे काहीही करणार नाहीत हे तर नक्कीच आहे आता. हे फक्त हातात बांगड्या घालून शाब्दिक निषेध करणार आणि परत असा हल्ला झाला तर पाकिस्तानला सोडणार नाही वगैरे पोकळ धमक्या देतात. अरे 
१०-१२ भडवे पाकडे येतात आणि अत्याधुनिक शत्रानी आमच्या निरपराध नागरिकांवर गोळ्या झडतात. कधी दंगे घडवून आणायचे तर कधी 12-13 बॉम्बस्फोट कायाचे,कधी दिवसाढवळ्या येऊन मुंग्यांसारखी लोक मारायची तर कधी लोकलमधेच 7-8 बॉम्बची माळ लावायची. पूर्वी हिंदूंची राज्य 
जिंकल्यावर हे मुघल लोक हिंदूंच्या रक्ताने होळी खेळायचे आता स्फोटांच्या आणि बंदुकांच्या आवाजांनी दिवाळी साजरी करतात. म्हणल न कि काही काही बदलल नाहीये. रोज सकाळी मुंबईतला नोकरदार किती वाजता उठतो आणि बाहेर पडतो हे कदाचित त्या सुर्यानारायणानेपण नसेल पाहिलं! 
लोकलमधल्या गर्दीत चेम्बून ऑफिसमध्ये मरेस्तोवर काम करायच आणि संध्याकाळी परत दहशतीत घरी यायचं !! किती आणि का सहन कायच हे 
सगळ.
देशाची सुरक्षा यंत्रणा आहे कुठे ? सुरक्षा यंत्रणा सज्ज नसते का त्याला पण भोक पडली आहेत..परवाच पेपर मधे बातमी वाचली कि एक मलेशियन जहाज दुसर्या एका मोठ्या जहाजाला ओढत होत आणि त्याचा दोर तुटला आणि ते चौपाटीवर येऊन वाळूत फसल. जहाज असं
विनाचालक येण्याचा गेल्या 3 वर्षांमधला दुसरा प्रकार. अरे ते किनार्याजवळून न्यायला परवानगी कोणी दिली. खरा तर हे जहाज बांद्रा-वरळी सी-लिंक वर आपटण्याचा कट होता असही आईकल आहे. स्वताच्या सीमारेशांबाबत इतका निष्काळजी देश दुसरा नसावा जगाच्या नकाशावर. काश्मीरमध्ये उत्पात सुरु आहेच. आता तर तिथे काश्मीरला आजाद करण्यासाठी दिवसाढवळ्या मोर्चे लागतात आणि सरकारला संचारबंदी जाहीर करावी लागते. चीनने जे तिबेट मध्ये केल तेच पाकिस्तान काश्मीर मधे करतय..हिंदुना पळवून लावायचं आणि तिथे पाक घुसखोरांना स्थलांतरित 
करायचं. तिकडून पूर्व दिशेने माओवादी आहेतच त्यांना अर्थातच चीनच पाठबळ आहे. चीनने भारतचे तुकडे करायचा घात घातला आहे म्हणे आणि त्यांच्याकडे तसा आराखडा पण तयार आहे. चीनने भारताच्या सीमारेषेपलीकडे मोठे हमरस्ते बधले आहेत ज्यामुळे सीमारेषेवर चीन आपल्यापेक्षा जास्त लवकर सैन्य जमवाजमव करू शकतो. चीन काश्मीर साठी वेगळा विसा देते आणि आपल्या पंतप्रधानाच्या अरुणाचलप्रदेश दौर्याला विरोध करते. आता ब्राह्पुत्रेव्र धरण बघायचा कुटील डाव पण शिजत आहे बीजिंगच्या पोलादी पिंजर्यात. चीन झाल, पाकिस्तान झाल, नाही तर नाही बांगलादेशपण उपकार विसरून आसाममध्ये घुसखोरी करतोय. कदाचित लवकरच आसामचा पुढचा मुख्यमत्री बांगलादेशी असेल. भुक्कड प्रशासनामुळे सर्व बाजूने नाडला गेलेला देश आहे हा ! धर्मशाळा म्हणायचीसुद्धा लाज वाटते आता .

कधी विचार करतो या सगळ्याला आपली मानसिकता तर कारणीभूत  नाही न ! कोणालाच वाटत नाही का कि देश सुस्थित असावा. आपला इतिहास चाळत मागे गेल तर alexandarच  आक्रमण घ्या किन्वा त्यानंतर शक-कुशाण आणि मग १३ व्या शतकात अफगाण /मुघल लोकांच आक्रमण. हे शक्य का झाल कारण देश आपल्यातच लढत होता आणि कधीच या अक्रमणाशी खर्या अर्थाने एक होऊन नाही लढला. संकट आपल्या दरवाज्यापर्यंत येईपर्यंत म्हणा किंवा गळ्यापर्यंत पाणी आल्यावरच आपण जागे होतो. मग तडफड चालू होते पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. शूर पराक्रमी पृथ्वीराज चौहानच उदाहरण घ्या नाहीतर देवगिरीच्या अनन्ग्पालाच उदाहरण घ्या. सगळे एकेकटे लढले आणिहरले. 2 वेळा घौरीला सोडण्याची गांधीगिरी पृथ्वीराजला नडली. तिसर्यावेळी राजा प्रीथ्वीराज हरला तो गांधीगिरीने आणि आपापसातील भांडणातून उत्पन्न  झालेल्या फितुरीने .आत्ताच्या परीश्तीशी compare केल तर थोड्याबहुत फरकाने तेच चित्र आहे. देशाला कीड लागलीय, 
छुपी आक्रमण होत आहेत हे काह्रे धोके सोडून तुम्ही कसले प्रांतीय वाद घालत बसला आहात. दोन्ही चोर एकमेकांकडे बोट दाखवतात आणि दोघेही आणखीनच 'भ्रष्ट'  होतात . अरे हरम्खोरानो जनतेचा 

पैसा खा पण कमीतकमी त्याचं रक्षन तरी करा रे ! ज्या हातानी खायला मिळत त्या 

हातांच रक्त-मास विकू नका दुसर्याला.

जागतिक राजकारणात सध्या Egypt, tunisia, Yemen, लिबिया सारख्या देशांमध्ये लोकशाहीसाठी 

निदर्शने होत आहेत. या मागे तिथल्या जनतेचा जसा प्रचंड असंतोष आहे तशीच एखादी लाट आपल्या 
देशात येऊन उलथापालथ होईल असा सुखद स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही. जनतेने 
हे सरकार पडून नालायक राजकारण्यांना हाकलवून देऊन लष्कराच्या हातात सत्ता द्यावी अशी स्वप्न 
आता बरायचं लोकांना पडायला लागली आहेत. लोकशाहीचा असा बोजवारा उडल्यावर जर हे स्वप्न 
प्रत्यक्षात उतरलं नाही आणि आपले कर्मदरिद्री राजकारणी नेते सुधारले नाहीत तर ईश्वर आपल्या 
आत्म्यास शांती देओ ! असा जप करत पुढील आयुष्य दहशतीच्या छायेत जागाव लागेल यात शंका 
नाही.

-- 
-Manya

Sunday, June 26, 2011

भटांच कोकण ...कोकणची भटकंती


साधारण ३ वर्षांपूर्वी माझा कोकण भटकंती वर्णनाचा लेख मायबोलीवर पब्लिश झाला होता. आज बरेच दिवसांनी परत एकदा वाचला आणि जशाचा तसा माझ्या ब्लोगवर टाकत आहे  
-------------------------
योगेश ने लिहिलेला कोकणातला पाऊस हा लेख मला फार आवडला आणि आम्ही २००५ मधे केलेली कोकणची भटकंती आठवली. अगदी कोलेजपासून मनात होते की दुचाकी घेऊन एकदातरी कोकणची सहल करायची म्हणून. पण काही करणास्तव कॉलेज मधे असताना हे कधीच जमल नाही. माहिति तन्त्रज्ञान क्षेत्रात अल्यावर मात्र वाट्ला कि ५ दीवसांचा आठवडा असल्याने अशी २-३ दिवसाची ट्रिप होउ शकेल. आमच्या एका मित्राने नुकतीच ४ चाकी खरेदी केली होती आणि बकिच्यान्ची पण फार इच्छा होती कि आपण बाइक्स वरुन न जाता कारने जावं. (या आयटी वाल्यांना शारिरीक कष्ट् नकोत अजिबात डोळा मारा). एकूणच लोकांचा सूर लक्षात आला आणि आता एव्ह्ढे जमवून आणलेल्याचा विचका होतो कि काय अशी भिती वाटायला लागली. मग मी एकेकाला गाठून सांगितलं कि अरे दुसरा म्हणतो कि बाइक्स घेऊन जाउ, कार नको म्हणुन. प्रत्येकाला आश्चर्य वटायच कि असा एक्दम कसा काय चेन्ज् झला पण कोणीच कधी ऊलट्तपासणी केली नाही. हे सगळ करताना मला खात्त्री होती कि कारपेक्षा बाईकनेच जास्त मजा येइल.
शुक्रवारी होळीपोर्णिमा अस्ल्याने अम्हाला सलग ३ दिवस सुटी होती. ठरल्याप्रमाणे होळीपोर्णिमेच्या सकाळी आम्ही निघालो. सकाळी निघायच म्हणजे बहुतेकान्च्या कपाळावर आठ्या होत्याच त्यामुळे सगळे लोक निघेपर्यन्त ८:३० वाजले. जसजसा निघायला उशीर होत होता तसा लोकान्चा उत्साह कमी होत होता. त्यातच अम्च्यातल्या एकाने दुसर्याची बाइक आणली होती अणि त्याला ह्या पठ्याने स्वताची नदुरुस्त बाइक दिली होती. अम्ही जेमतेम बाणेर रोड्वर पोचललो असू तेव्हढ्यात त्या मित्राच फोन आला कि मला माझी बाइक परत दे म्हणुन. मनात म्ह्नणलं कि नकटीच्या लग्नाला हजार विघ्न म्ह्नण्तात ते यालाच ! कसबसा त्या मित्राची सम्जूत घालून अम्ही तिथून पुधे निघलो.
त्यादिवशी आमचं नशीब चांगल होता अणि भर ग्रीष्मात त्या दिवशी थोडासा ढगाळ वातावरण होत. ताम्हिणी घाटातुन पुढे जाऊंन आम्ही भूगावमार्गे आम्ही मुळशीला आलो. तिथे झोपडीवजा उपाहारगृह दिसल्याबरोबर मंडळीना भूकेची जाणीव जरा जास्तच तीव्रतेने होउ लागली. या झोपडीत काय मिळणार असा विचार मनात होताच पण अपेक्षाना तडा देण हा तर नियतीचा अगदी आवडता खेळ असतो हे आम्हाला विसरायला झाल. आम्ही कांदेपोहे, बटाटेवडा आणि मिसळ अशी मस्तपैकी आर्डर दिली अणि नंतर चहा हेही आधीच सांगून् टाकल. तोपर्यंत आम्ही इकडेतिकडे बघत गप्पा मारत वेळ घालवला. आम्ही आर्डर केलेले पदार्थ आले अणि मग सगल्या गप्पा बंद करून लोकानी समोर येईल त्यावर आडवा हात मारला. कांदेपोहे, बटाटेवडा आणि मिसळ याची चव कही औरच होती.ऑफिसमधे असताना कधीही टपरीवारचा चहा न पिणारे अणि सकाळचा नाश्ताही २ वेळा तपासून बघणारे आमच्यातले काही महाभाग आज भूक लागली असल्याने कोणतीही तकरार न करता जेवत होते. माणूस परिस्तितीचा गुलाम ! दूसरा कही नाही. त्यानंतर लोकांना जरा सुस्ती आली. काहिनीतर चला झाला मस्त जेवण आता इथूनच परत पुण्याला असाही सुर काढला. मग थोड़ा वेळ प्रवासाचा शिण घालवायला आम्ही मुळशी धरणाच्या परिसरात भटकलो. कहिजण मग फोटो काढायला लागले तर काहिनी पाण्यात पाय सोडले. १५ - २० मिनीटे तिथे थांबून अणि हो टपरीवाल्याला त्याचे पैसे आणि अनेक धन्यवाद देउन आम्ही आमच्या फटफटी परत सुरु केल्या. खरतर सुरुवातीला फक्त दिवेआगर अणि हरिहरेश्वर एवढच डोक्यात होता. त्यानंतर पुढे कुठे जायचा काहीच पत्ता नव्हता अणि खर तर त्यातच खरी गम्मत होती. आम्ही ६ जण् ३ बाइक्स वर निघालो होतो फक्त मस्त भटकायला. आम्ही निघालो...छोतीमोठी गाव ओलांडत्, रस्त्यावरच्या पाट्या बघत तर कधी लोकाना विचारत विचारत सरतेशेवटी माणगावला आलो. तोपर्य्नत दुपारच्या जेवणाची वेळ जाली होती. साधारण १२:३० च्या सुमारास आम्ही माणगावला पोचलो.
आत्तापर्यंत मातीच्या बदलत्या रंगानी, हवेने अणि वळणदार रस्त्यानी कोकणाच्या आगमनाचे संकेत दिले होतेच. पण जेव्हा आम्ही माणगावला आलो त्यावेळी मात्र तिथल्या बाजारात असलेल्या फ़णस,आंबे अणि सुक्या माशांच्या सामूहिक वासाने अणि दर्शनाने कोकणागमनावर शिक्का मोर्ताब केलं. साधारण १२:३० च्या सुमारास आम्ही माणगावला पोचलो. थोडी खरेदी केल्यावर आम्ही जेवण उरकून घेतल. आता थेट दिवेअगरलाच थांबायच असा आधीच जहीर केल्याने लोक 'ओ' म्हाणेस्तोवर जेवले. तसच सलग २ तास ड्राइव्हिंग केल्याने अंग चांगलच आकसल होतं. पण समोर असलेला माशांचा कालवण अणि सोलकढी पिताना प्रवासाचा शीण् कुठल्या कुठे पळून् गेल आणि परत तिन्ही घोडेस्वार पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो.
कोकनातले रस्ते वळंदार अणि दिवस पण असा की ड्राइविंग साथी झकास त्यामुळे आम्ही सगळे आळीपाळीने बाईक चालवत होतो. गम्मत म्हणजे आमच्यातल्या एकाला बाईक चालवायची फार हौस नव्हती त्यामुळे प्रत्येक्जण त्याला स्वतःच्या बाईक बस म्हाणायचा ! म्हणजे दुसर्याला बिनभोबाट बाईक दामटता यायची. निर्मनुष्य वलंदर रस्त्यांवर काळजीपूरवक तर सरळ रस्त्यांवर बर्य्यापैकी वेगात असा आमचा तोपर्यन्ताचा प्रवास चालू होता. पण दुपारच्या जेवणात काय मिसळलं होत कुणास ठावुक पण त्यानंतर सगळेच गाड्या चालवत नव्हते तर चांगले हाणत होते.
माणगाव वरुन मग आम्हि मुम्बई - गोवा महामार्गाने महाडकडे निघलो आणि काहि वेळाने मग म्हसाळे फट्याला उजवीकडे वळून परते एकदा कोकणातल्या गावतून प्रवास करयला लागलो. अर्थात आत्तापर्यन्त आम्ही सगळा प्रवास हा रस्त्यवर्च्या पाट्या वाचुन केला होता पण आता मात्र गावातुन प्रवास सुरु झाल्यावर बर्याचदा पाट्या अधुन मधुन गयब झालेल्या असायच्या त्यामुळे थाम्बत, विचारत प्रवास सुरु होता. आत्तापर्यन्त सगल्यानाच ड्रायव्हिन्ग्चा थोडासा 'अतिआत्मविश्वास' आला होता. त्याच प्रत्यन्तर लगेचच थोड्या वेळाने अम्हाला आला. दुपारचे २:३० वाजलेले, दिवेआगार अता पन्नासेक किलोमिटर रहिल असेल नसेल आणि आम्हाला एक घाट लागला. आधिच मर्कट नि त्यात मद्य प्याला अशि स्थिति झालेली. कारण प्रवासचा शीण, भूक अणि अतिअत्मविश्वसाने 'भरावून' गेलेल्या घोडेस्वरानी गाड्या पळवायला सुरुवात केली. मी सर्वात पहिल्या बाइकवर होतो नि आमच्यातला सुजय सर्वात मागच्या बाइकवर होता. अत्तापर्यान्त तो आमच्यात सर्वात वेगाने गाडी चालवत्त होता. थोदावेळाने पठिमागून सचिन ने जोरात होर्न वाजवला आणि थांबण्याची खूण केली. काय झाल म्हणून विचारल तेव्हा सुजयची गाडी स्लिप झल्याच कळल. आम्हि ताबडतोब माघारी फिरलो आणि थोडच अन्तरावर सुजयची बाइक डिसली. सुदैवाने खरचटण्यापलिकडे कोणालच काही लागल नव्हता. उतारावर एका वळणावर वेगाचा अन्दाज न आल्याने गाडी स्लीप झाली आणि घसरत घसरत रस्त्याच्या कडेला असणार्या छोट्याश्या झुडुपाला जाउन थाम्बली. सहज म्हणून झुडुपाच्या पलिकडे जाऊन पहिल आणि काळजाचा थरकाप उडाला. झुड्पाच्या पलिकडे खोल दरी होती. जर झुडुप नसत तर काय झाला असत या विचाराने अंगावर काटा आला. सुजयने अनेक शिव्या खाल्ल्या हे काय वेगळ सान्गायला नकोच. पण याचा एकच फायदा असा झाला कि त्यानन्तर सम्पूर्ण ट्रिपमधे कोणीच निश्कल्जिपणे ड्रायव्हिंग् केल नाही.
दिवसभर ड्रायव्हिंग करुन नहि म्हणल तरी लोक जरा नरमली होती. त्यामुळे वाटेत जमेल तेव्हढ थाम्बत आणि प्रसंगी निर्मनुष्य रस्त्यावर आडवं पडून जमेलत्या प्रयत्नाने फ्रेश रहायचा प्रयत्न करत होतो. शेवटी सधारण दुपारी २:३०-३ च्या सुमरास आम्ही दिवेअगरला पोचलो. निघताना २-३ पत्ते घेतले होतेच त्याचा आता फायदा होणार असा वाटत असतानाच पहिली नकारघन्टा वाजली. दुसर्या दिवशी होळी असल्याने बरीच कामगार मंडळी सुट्टी घेउन आपापल्या गावी गेली होती. त्यामुळे बहुतेक ठिकाणी नकार मिळत होते. हो, पण् नकार देतानादेखील समोरचा माणुस अत्यन्त आदबशीर, नम्रपणे आणि हात जोडुन् बोलायचा आणि त्याच्वेळी आजुबाजूचे ४ पत्तेदेखील् द्यायचा. मग काय आमची मिरवणूक् त्या दिशेला वळायची. डोक्यावर रणरणतं ऊन अणि पोटात सपाटून लाग्लेली भूक या दोनच गोष्टी आता स्फुर्तीदायक् वाटत होत्या. शेवटी एका गल्लीच्या तोन्डाशी असलेल्या श्री.पाटील यान्च्या घरात आमची जेवणाची सोय झाली. मस्त थंडगार पाण्याने हातपाय धुतल्यावर आणि तहान भागवल्यावरकुठे मंडळीना जरा स्थैर्य आल. त्यानन्तर समोर वाढलेल उकडीच्या मोदकाच जेवण ही म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. जेवणावर आडवा-उभा जसा जमेल तसा हात मारला आणि श्री.पाटील साहेबाना लाख लाख धन्यवाद दिले. आमचा जेवण होईपर्यन्त श्री. पाटील यानी आमच्या राहउयाचीदेखिल सोय केली होती. तिथे जवळ्च श्री.जोशी यान्च्या साकेत वर अमची रहायची सोय झाली. तसच तिथे जाण्यागोदर गणपतीचा दर्शन घ्यायचा सल्ला दिला. खरतर आम्हाला त्यावेळी स्वत: श्री.पाटीलच एखाद्या देवासारखे वाटत होते. मग रात्रीच्या जेवणाच आश्वासन देउन मग आम्ही ह्या बाप्पाचा निरोप घेतला अणि दुसर्या बप्पाच दर्शन घ्यायला निघलो. सोन्याच्या गण्पतीच दर्शन घेउन मग अम्हि पुढे श्री. जोशी यन्च्या साकेत वर अलो. त्यांनीही यथोचित स्वगत केल आणि आम्हाला आमची 'जागा' दाखवून दिली डोळा मारा. लहानपणी शालेतून आल्यावर दफ्तर टाकून ज्याप्रमाणे खेळायला जायचो त्याप्रमाणे सर्वात आधी समुद्रावर गेलो आणि पाण्यात मनसोक्त डुंबलो. समुद्राच्या वाळूत बाईक्स चालवल्या. हा अनुभव नवीन होता. तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळून मस्त दमून भाकून आम्ही परत साकेत वर आलो तर श्री जोशी यानी मस्त विहीरीत्ल्या पाण्याने आमची आंघोलीची सोय केली. मला एकदम माझ्या मामाच्या गावाची, आजोळ्ची आठवण झाली. त्या रात्री श्री. पाटिल यांच्याकडे परत एकदा सुग्रास जेवण उरक्ल्यावर मग आम्हि सगळे गावात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो. त्यादिवशी होळीपौणिमा असल्याने एकेठिकाणी मस्त पेटलेल्या होळिभोवताली बोंब मारणार्या लहान-मोतठ्यांमधे आम्हीहि सामील झालो. रात्री शीतल चंद्रप्रकाशात सागरकिनारी गेलो. कोणालाच फार काहिही बोलायची गरज वाटली नाही कारण काही क्षण हे अनुभवायचे असतात, जगायचे असतात. तिथून परत आल्यावर दिवसभराच्या श्रमाने आम्हाला कधी झोपा लागल्या ते समजलदेखील नाही..
दुसर्या दिवशी सकाळी जाग आली तीच मुळी पक्षान्च्या किलबिलाटाने आणि चूलीतल्या विस्तवात जळ्णार्या लाकडांच्या धूराच्या वासाने. बाहेर चांगलं उजाडल होता. पटापट आवरुन मग आम्हि सकाळचा नाष्टा उरकला. थर्मासमधला वाफाळलेला चहा आणि गरम गरम कान्दापोहे यांवर यथेछच ताव मारला. दीवेआगर - हरिहरेश्वर ही जोड्गोळी माहिती होती त्यामुळे इथून हरिहरेश्वर गठायच हे अगदी निश्चित होता. पण त्याचबरोबर आता इथुन पुढे कसा जायचा हा प्रश्ना होता अणि अर्थातच श्री. जोशी इथेही आमच्या मदतीला आले. त्यानी पुरवलेल्या महितीनुसार हरिहरेश्वरला जायचे २ मार्ग होते. एक गावतून जाणारा तर दुसरा थोडा अवघड पण समुद्राच्या शेजारून जणारा. सर्वानी एकमताने (कधी नव्हेते !) दुसर्या मार्गाने जाण्यचा ठराव पास केला. मग सुरु झाला दीवेआगर - हरिहरेश्वर असा तो रोमांचकारी प्रवास्. रोमांचकारी अशाकर्ता की हा रस्ता फार चांगल्या अवस्थेत नव्हता त्यामुळे गाड्या काळजीपूर्वक चालवाव्या लागत होत्या आणि त्याचवेळी प्रत्येकाला एकाबजूने डोंगररांगा आणि दुसर्याबजुने समुद्राची सोबत या मनोहारी द्रुष्याचा साक्षिदार् व्हायं होतं. आम्हि निसर्गाचा हा देखावा कँमेर्यात बन्दीस्त करत होतो. या रस्त्याने जाता जाता कधी आम्ही हरिहरेश्वरला पोचलो ते समजलदेखील नाही. मन्दिरात जाऊन आम्हि दर्शन घेउन बाहेर आलो. सहज म्हणुन प्रदक्शिणा मर्गावर गेलो आणि एकुणच हे काम आपल्या अवाक्याबहेरचा अहे हे जाणवल. सम्पूर्ण प्रुथ्वीला प्रदक्शिणा घालण्याऐवजी स्वत:च्या आई वडिलाना प्रदक्शिणा घालणार्या गजाननाच्या दन्तकथेची आम्हाला ऐन्वेळी आठवण झाली आणि मग आम्हीपण तिथेच देवळाला एक लहानशी फेरी मारून घेतली. तिर्थप्रसाद घेउन बहेर आलेल्या आम्च्यासमोर यक्ष प्रश्न उभा होता तो म्हणजे आता पुढे काय? योगायोगाने आम्हाला तीथेच देवळबाहेर एका दुकानात हरिहरेश्वर आनि परिसराचा एक नकाशा मिळाला. वीतभर लांबीचा तो तुकडा पाहून त्याच्यावर कितपत् विश्वास ठेवावा हाही एक प्रश्णच होता. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतातना ते यालाच कारण तसाही अमच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्ह्ता. समोर दिसणार्या देवळाच्या कळसाला नमस्कार करून आमची वरात निघाली. वाटेत एके ठिकाणी थाम्बून चहा - पाणी आणि नकाशावाचन करून असा ठरल कि इथुन पुढे बाण्कोट गाठायचा आणि तिथुन रस्त्याने केळ्शीला जायच. चलो केळ्शी म्हणत अम्ही बाणकोटचा रस्ता धरला. रस्ता तसा कच्चा आणि खाचखळग्यानि भर्अलेला होता आणि सम्पूर्णा प्रवासात ज्या गोष्टिची आम्हाला भिती वाटत होती ती घड्ली. मी चालवत असलेली बाइक पन्क्चर झाली. अजुबाजुला एकही दुकान दीसत नव्हत तरी नशिबानी थोड्या अन्तरावर एक वस्ती दिसत होती. तिथे जायला निघालो तर वाटेत एके ठिकाणी ‘शौकीन’ सचिनला एकजण ताडी काढताना दिसला. हा पठ्या लगेच तीथे जाउन त्या इसमाकदुन २ द्रम भरुन ताजी ताजी ताडी घेउन आला. प्रत्येक्जण उन्हाने तहानलेला होता. आम्ही कही जणानि ताडीचा मन्सोक्त आस्वाद घेतला. एखद्या शहाळ्याच्या पाण्याला लाजवेल अशा त्या गोडसर ताज्या ताडीने आम्हि आमच्या तहान भागवल्या आणि उरलेली कँनमधे अम्च्याबरोबर ठेवुन दिली. ताडी म्हणल्याबरोबर कपाळाला अकारण आठ्या पाडणारे कही जण होतेच आमच्याबरोबर्. शेवटी पन्क्चर झालेली ती गाडी कधी ढकलत तर कधी चालवत आणि हो ताडी पित पित अम्ही एक्दाचे त्या वस्तीजवळ आलो. अधे मधे गाडी ढकलायची वेळ अम्च्यापैकी प्रत्येकावर एकेकदा आली त्यामुळे ताडीला 'अब्राह्मण्यम्' म्हणणार्यानी पण मन आणि झक मारत शेवटी ताडी प्यालीच.
आम्हि त्या छोट्याशा वस्तीला आलो आणि पन्क्चर कढायची सोय कुथे होउ शकेल याचा अन्दाज घ्यायला लगलो. खुप वेळ शोधल्यावर एक सायकलचं दुकान वजा घर दिसल. तिथल्या माणसाने बाईकच पन्क्चर कढायला असमर्थता दाखवली आणि एवधेच नाही तर जवळ्पास कुठेच हे काम करुन मिळणार नही असा सांगून दुसरा बॉम्ब टाकला. शेवटी त्याच माणसाला बाबा-पुता करून आम्हि तयार केल. मग अम्हिही मदत करायला लागलो आणि शेवटी बर्याच प्रतत्नानी ते बाइक्च चाक देहावेगळ केल, त्यातली ट्युब काढून त्यातल पन्क्चरदेखिल काढल. पॅच लवताना मात्र सगळे सोपस्कार सायकल दुरुस्तीप्रमाने झाले आणि शेवटी माझी ती बाइक पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाली. माणसाचा ऑपरेशन करणार्याने एखाद्या गुराला टाके मारावेत ना! तसा प्रकार होता सगळा. एक छोटासा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करून आम्हि तिथुन निघालो. एव्हाना दुपारचे बारा वाजले होते. शेवटी मजल दरमजल करत करत आम्हि बागमांडला येथे पोचलो. मगाशी भेटलेल्या सायकलवाल्याने अम्हाला बागमांडला येथुन सुटणार्या फेरिबोट्विशयी माहिती दिली होतीच. जेव्हा आम्हि तिथे पोहोचलो तेव्हा एक फेरिबोट थोद्याच वेळात निघणार होती मग काय क्षणाचाही विलंब न करता आम्हि आमच्या बाइक्स त्या लॉंन्चमधे घातल्या आणि मग कोकणातली आम्ची पहिली समुद्रसफर सुरु झाली. आम्हाला सर्वानाच खुप अनन्द झाला होता. याला २ करणे होती एक म्हन्जे केळ्शीला बाइक्ने पोचायला १ -१:३० तास सहज लागला असता. तो त्त्रास तर वाचलाच पण अनपे्क्षीतपणे हा छोटासा पाण्यावर्चा प्रवास करायला मिळाला. साधारणत: अर्ध्या तासानन्तर आम्हि पलिकडे बाणकोटला पोचलो. किनर्यावर पोचतानाच आम्हाला दुरूनच गावातले लोक एक मिरवणुक काढत नाचताना दिसले. लहान्पणी होळीच्या दिवशी घालायचो तशा मुखवट्यांची आठवण झाली. कालच होळिपोर्णिमा झाली होती. आपल्या सग्ल्यान्चा पण प्रकर्षाने कोकणातला महत्वाचा सण. अर्थात त्याची प्रचिती आम्हाला अद्ल्यादिवशी दिवेआगारलाच आली होती. आम्हि या विचारात असताना ती मिरवणुक आम्हाला येउन भिडलीदेखील. आम्ही सगळे बाइक्वर होतो आणि नवखे दिसत असल्याने जमावाने आम्हाला आडवले. अर्थात हे सगळ अगदी सहज, रिवाजाप्रमाणे आणि कोणालाही त्त्रास न देता. अर्थातच आम्ही देखील हा 'पहुणचार' छान एन्जॉय करत होतो. त्यांच्याबरोबर एक लहानसं फोटोसेशन करून आणि परत भेटूच असा आश्वासन देउन आम्ही पुढे निघालो. त्या छोट्याशा वस्तीतुन पुढे जात्ताना आणि आजुबाजुला बघताना आम्हाला फार मजा वाटत होती. एकेठिकाणी थोडं थांबून आम्ही मस्त थन्डगार पाणी प्यालो. अगदी सहज म्हणून आम्ही थोडावेल्पूर्वी मिळालेला तो नकाशा परत एकदा नजरेखालून घातला आणि एकदम लक्षात आल कि त्यात आम्हि आत्ताच पार केलेल्या खाडीचा भागदेखील अगदी व्यवस्थित दाखवला होता. आमचा सगळ्यांचा त्या कागदाच्या तुकड्यावर एकदम विश्वास बसला. बुडत्याला आता काडीचा नव्हे तर चांगला ओंण्ड्क्याचा आधार होता आता!
पुढे आता आम्हाला जायच होतं केळशीला. परत एकदा गाड्यांवर स्वार होऊन आम्हि भरपूर ऊन, खड्डे आणि धूळ अशा परिस्थितीतून प्रवास सुरु केला. वाटेतल्या छोट्या छोट्यावस्त्यांमधली लहान लहान मुले वाटेत गाड्य आडवून होळीची वर्गणी मागत होती. त्याना कधी पैसे देत तर कधी नकार असं करत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवल. पुढे वाटेत आम्हाला एक छोट्स गाव लागल जिथे दोन गटात रस्सीखेच चालु होती. आधिक विचारणा केल्यावर होळिच्या सणानीमित्त हा खेळ चालू असल्याच समजल. तेव्ह्ढ्यात तिथल्या लोकांची नजर आम्च्यावर गेली आणि त्यानी मग आम्हालाही त्यात सहभागी व्हायला सान्गितल. आता त्यानी अम्च्या गाड्या आडव्ल्यामुळे दुसरा इलाजच नव्हता. मग काय विचारता, एकीकडे आम्हि आणि दुसरीकडे गावातले लोक यान्च्यात रस्सेखेच सुरु झाली. कोकणात्ल्या चीवट्पणासमोर शहरी चालूपणाचा निभाव तो काय लागणार ! तरिदेखील ३ पैकी १ दा आम्हि जिन्कलो. कालपासून कोकणमधे फिरताफिरता आणि हे सगळ अनुभव घेताना खर तर आम्हि कधि कोकणातलेच एक होउन गेलो ते समजलसुधा नाही. त्या सगळ्या लोकांचे आभार मानून आणि त्याना लाख लाख धन्यवाद देत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
पुढे मग आम्हि केळशी गाठल आणि मग तिथून अन्जर्ले येथे आलो. सर्वात पहिल्यांदा आम्हि तेथे कुठे खायला काही मिळत का याचा शोध घ्यायला लगलो. त्यादिवशी तिथेच कुठेतरी राहुन मग दुसर्यादिवशी परतीचा प्रवास करावा असा निर्णय घेतला. पण परत एकदा होळिनीमित्त कामगार सुटीवर गेल्याने कुठेच आमची जेवायची आणि पर्यायाने रहायची सोय होउ शकली नाही. सर्वठिकाणी मिळाला तो आदबेने हात जोडून नम्र नकार. शेवटी परत एकदा नकाशा पाहून आम्हि दापोलीला जायचा निर्णय घेतला कारण यापुढे लहान लहान गावात राहायची सोय होइल याची खात्री नव्हती. पण पोटतली भूक काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. आम्हि अन्जर्ले गावात्तल्या त्या चोट्याशा गवात कुथे काही खायला मिळते का ते बघायला लागलो. एका मस्त छोटेखानी टुमदार घरात शेवटी आमची खाण्याची सोय झाली. त्या माउलीने केलेले ते गरम गरम कांदेपोहे खाता खाता कोकणातली ती भुकेली सन्ध्याकाळ त्रुप्त झाली. त्यानन्तर आमची सुस्तावलेली फटावळ थोद्याश्या सन्थपणे दापोलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. एव्हाना सन्ध्याकाळचे ५ - ५:३० वाजले होते आणि आम्हि वळणदार आणि सभोवताली गर्द झाडी असलेल्या रस्त्यांवर ड्रायव्हिंगची मजा घेत हळुहळु अन्जर्ले गावाचा निरोप घेत होतो. अंजर्ले सोडून मग आम्ही हर्णेला जायचा रस्ता पकडला. आता घाटमाथ्यावरून हळूहळू आम्ही खाली उतरायला लागलो. अधुन मधुन एखाद्या वळणावरुन खाली समुद्रात नांगर टाकून पहुडलेल्या आणि रन्गीबेरंगी झेंडे लवलेल्या मच्छीमार्यन्च्या होड्या फारच सुन्दर दिसायच्या. उतरत उतरत आम्ही परत एकदा समुद्रसपाटीला आलो. समुद्रालगतच्या वस्त्यामधुउन आमचा प्रवास सुरु होता. या संपूर्ण प्रवासात दूरवर समुद्रात आम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला बराच वेळ दिसत राहिला.
आता हर्णेरोडने दापोलीला पोचायच आणि वेळ मिळेल तर मग पुढे दाभोळ गाठायचा असा बेत होता. खरतर आम्हि असं ठरवल होता कि दभोळला जाउन परत एकदा जेट्टी पकडायची. ती म्हणे थेट गुहागरला जाते. तिथे श्रीगणेशाच दर्शन घेउन मघारी फिरायच असा बेत होता. पण ही सहल नव्हती तर फक्त भटकंती होती त्यामुळे योजलेले कार्यक्रम आणि आखलेल वेळापत्रक कोलमडण्यातच खरी मजा होती. आम्हि दापोलीला पोचलो तेव्हा २ दिवसानान्तर आता खरच एखाद्या शहरात आल्याची जाणिव झाली. तिथे पोचल्या पोचल्या पहिली गोष्ट् म्हणजे मोबाइलची रेन्ज आली त्यामुळे प्रत्येकाने पहिला घरी फोन करून प्रवास सुखरुप होत असल्याच कळवलं. एव्हाना सूर्यास्ताची चाहूल लागली होती. आम्हि आमचा गुहागरचा प्लॅन अजूनतरी आमच्यापाशीच ठेवला होता. परत एक्दा मजल दरमजल करत आम्हि दाभोळ्च्या अगदी जवळ अलो. घाटमाथ्यावरून गावाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. घाट उतरता उतरता एका वळ्णावर अनपेक्षितपणे तो मवळता सूर्यनारायण आमच्या समोर आला. लालसर सोनेरी दिसणारा तो गोळा अस्ताला जात होता. गेले दोन दिवस आम्हि विस्तिर्ण समुद्र, विशाल सागरतीर, नारळी पोफळीची बनं पहात होतोच पण आता निसर्गाने त्याच अजुन एक रुप दाखवून परत एकदा आमचं खुजेपण दाखवुन दिलं. हा सूर्यास्त दाभोळच्या समुद्रकिनार्यवरून बघायचाचं हे ठरवून आम्हि खाचखळ्ग्यातून वाट काढत समुद्रावर आलो पण तोपर्यंत थोडासा उशीर झाला होता. दुर एकाकडेला बन्द पड्लेला दाभोळ वीजप्रकल्पसोडून आम्हाला दुसरं काहीच दिसल नाही. त्यादिवशी आम्ही दाभोळलाच एका लहानश्या हॉटेलवर राहिलो. रात्री जेवणासाठी मस्त ताजे ताजे मासे होते. रात्री भरपूर जेवण करून आम्हि सहज म्हणून एक चक्कर मारायला बाहेर पडलो. सहज फिरत फिरत आम्हि समुद्राच्या बजूला आलो. तिथे एक छोटीशी लॉन्च काही प्रवाशाना घेऊन निघणारच होती. आम्हि त्याना विनवणी केल्यावर ते आम्हाला घेऊन जायला तयार झाले. मग काय विचारता इकडून् त्या किनार्यावर आणि तिथुन परत असा तो अर्ध्या-पाउण तासाचा प्रवास कधीच सम्पु नये अस वाटत होत. समुस्राच्या पाण्याचा सन्थ अवाज, मन्द सुटलेला वारा आणि चन्द्रप्रकाश्...धुन्दी चढायला असा कितिसा वेळ लाग्णार ! त्यानन्तर बराचवेळ गप्पागोष्टी करण्यात मस्त गेला.
आद्ल्या दिवशी केलेला प्रवास आणि रात्री उशीरा झोप यामुळे दुसर्यादिवशी उठायला अंमळ उशीरच झाला. अर्थातच आम्ही आमचा गुहागर प्लन रद्द केला. आता परत दापोली गाठायच ठरल आणि तिथुन पुढ्चं पुढे बघु असा विचार करून आम्ही निघालो. आम्च्याकड्चा तो नकाशा आता आम्हाला उपयोगी पड्णार नव्हता कारण त्यात दापोलीच्या पुढचं काहीच नव्हत. तरीपण आत्तापर्यन्त त्याने आमची सोबत केली होती त्यामुळे एक आठ्वण म्हणून तो तुकडा आम्ही जपून ठेवला.
दापोली पर्यन्तचा प्रवासदेखील मस्त झाला एकदम्. अजुबजुची आंब्याची झाडं आत्ताकुठे मोहरायला लागली होती. त्याचा घमघमाट सोबतीला होताच. आता फक्त अचानकपणे पाउस नाही पडला तर यावेळी फळ चांगल येणार याची ही नान्दीच होती जणू! बाजूने असलेल्या काजूच्या झाडानादेखील लाल्-पिवळे कजूगर लटकत होते. अशा वातावरणात मन उधाण होईल नाहीतर काय! आम्हि दगड मारून २-४ कजूगर पाडले. ते खाताना त्यातला रस सांडून आमच्या कपड्यान्वर 'कायमचे' डाग पड्ले. असच रमत गमत आम्हि दापोलीला पोहोचलो. तीथे उदरम्भ्ररणम करून मग महाडला आलो. महाड सोडलं आणि थोड्याच अन्तरावर अम्हाला शिवथरघळच्या पाट्या दिसायला लागल्या. आता इतके लाम्ब आलोच आहोत तर समर्थांच्या ह्या घळीत जाउन दर्शन करून यावं हा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. "जनी वन्द्य ते सर्व भावे करावे" म्हणत आम्ही महाड - भोर मार्गावर डावीकडचा शिवथरघळचा फाटा पकडला.आत्तापर्यन्त कोकणात्ल्या त्या हिरवाईने आमच्या डोक्यावर सतत छत्र धरलं होतं आणि कडक उन्हापासून आमचा बचाव केला होता. आतामात्र आम्ही कोकणातुन बाहेर आल्याने अगदीच 'उघद्यावर्'पडलो होतो. आम्हि भर दुपारी २:३० - ३ च्या उन्हात त्या घाळीत गाड्या घातल्या आणि आम्हाला उन्हाने जाळायला सुरुवात केली. आजुबजुला कमाल शुष्क प्रदेश आणि रखरखाट यातून आम्हि गाड्या दामटत होतो. सततच्या कोरड्या वार्यान्मुळे आमच्या घशाला कोरड पडत होती आणि त्यातच अम्च्याकडच पाणीही संपलं. शेवटी कसाबसा केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर आम्हि शेवटी एकदाचे घळीत पोचलो. गेल्या गेल्या तिथल्या रांजणांमधे भरून ठेवलेल थंडगार पाणी उदंड प्यालो. समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जागेत एक चक्कर मारून मग सायंकाळी ५ च्या सुमरास आम्हि परत नघालो. परतताना लांब अजगराप्रमाणे वाटणार्या वरन्धा घाटात आम्हि 'माकडान्च्या' साक्षीने चहापान कार्यक्रम उरकला. (हे उद्गार 'माकडांचे' नाहीत आमचे आहेत.) पुढे नंतर तिथे काढलेल्या फोटोंमधला आमचा अवतार पाहून कदाचित त्या माकडांची अम्च्याबद्दल हीच प्रतिक्रिया असू शकेल अस वाटलं. घाट उतरून भोर-खेड-शिवापुर मार्गे सन्ध्याकाळी ७:३० वाजता आम्हि पुण्याला परत आलो.
गेले २-३ दिवस आम्ही कोकणात मनमुराद भटकलो होतो, अनेक गाव फिरलो, बर्याच माणसाना भेटलो. सुरुवातीला कोकणात जाउन तिथे फक्त भटकायची आमची ईच्छा होती. आम्हाला भटकण्याचा अनुभव तर आलाच पण ह्या सगळ्याच्या पलिकडे आम्हि जे कोकण अनुभवल ते आम्हाला बरच काहि देउन आणि शिकवून गेलं. हा अनंद घेताना आम्हिदेखिल कचरा न करणे, मोठ्याने ओरडुन गोंघळ न घालणे आणि गावात्ल्या लोकांशी नम्रपणे वागणे अशा काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. या लहान्-मोठ्या गोष्टींच भान, कोकणाबद्द्ल वाटणार प्रेम आणि ईच्छाशक्तिच्या जोरावर आम्हि सगल्यानीच आमचं कोकण भटकंतीच स्वप्न साकार केलं.
भटक्यांसाठी आमच्या कोकण सफरीच्या मार्गाची लिंक देत आहे
http://www.konkanyatra.com/roadmap.html