साधारण ३ वर्षांपूर्वी माझा कोकण भटकंती वर्णनाचा लेख मायबोलीवर पब्लिश झाला होता. आज बरेच दिवसांनी परत एकदा वाचला आणि जशाचा तसा माझ्या ब्लोगवर टाकत आहे
-------------------------
योगेश ने लिहिलेला कोकणातला पाऊस हा लेख मला फार आवडला आणि आम्ही २००५ मधे केलेली कोकणची भटकंती आठवली. अगदी कोलेजपासून मनात होते की दुचाकी घेऊन एकदातरी कोकणची सहल करायची म्हणून. पण काही करणास्तव कॉलेज मधे असताना हे कधीच जमल नाही. माहिति तन्त्रज्ञान क्षेत्रात अल्यावर मात्र वाट्ला कि ५ दीवसांचा आठवडा असल्याने अशी २-३ दिवसाची ट्रिप होउ शकेल. आमच्या एका मित्राने नुकतीच ४ चाकी खरेदी केली होती आणि बकिच्यान्ची पण फार इच्छा होती कि आपण बाइक्स वरुन न जाता कारने जावं. (या आयटी वाल्यांना शारिरीक कष्ट् नकोत अजिबात
). एकूणच लोकांचा सूर लक्षात आला आणि आता एव्ह्ढे जमवून आणलेल्याचा विचका होतो कि काय अशी भिती वाटायला लागली. मग मी एकेकाला गाठून सांगितलं कि अरे दुसरा म्हणतो कि बाइक्स घेऊन जाउ, कार नको म्हणुन. प्रत्येकाला आश्चर्य वटायच कि असा एक्दम कसा काय चेन्ज् झला पण कोणीच कधी ऊलट्तपासणी केली नाही. हे सगळ करताना मला खात्त्री होती कि कारपेक्षा बाईकनेच जास्त मजा येइल.

शुक्रवारी होळीपोर्णिमा अस्ल्याने अम्हाला सलग ३ दिवस सुटी होती. ठरल्याप्रमाणे होळीपोर्णिमेच्या सकाळी आम्ही निघालो. सकाळी निघायच म्हणजे बहुतेकान्च्या कपाळावर आठ्या होत्याच त्यामुळे सगळे लोक निघेपर्यन्त ८:३० वाजले. जसजसा निघायला उशीर होत होता तसा लोकान्चा उत्साह कमी होत होता. त्यातच अम्च्यातल्या एकाने दुसर्याची बाइक आणली होती अणि त्याला ह्या पठ्याने स्वताची नदुरुस्त बाइक दिली होती. अम्ही जेमतेम बाणेर रोड्वर पोचललो असू तेव्हढ्यात त्या मित्राच फोन आला कि मला माझी बाइक परत दे म्हणुन. मनात म्ह्नणलं कि नकटीच्या लग्नाला हजार विघ्न म्ह्नण्तात ते यालाच ! कसबसा त्या मित्राची सम्जूत घालून अम्ही तिथून पुधे निघलो.
त्यादिवशी आमचं नशीब चांगल होता अणि भर ग्रीष्मात त्या दिवशी थोडासा ढगाळ वातावरण होत. ताम्हिणी घाटातुन पुढे जाऊंन आम्ही भूगावमार्गे आम्ही मुळशीला आलो. तिथे झोपडीवजा उपाहारगृह दिसल्याबरोबर मंडळीना भूकेची जाणीव जरा जास्तच तीव्रतेने होउ लागली. या झोपडीत काय मिळणार असा विचार मनात होताच पण अपेक्षाना तडा देण हा तर नियतीचा अगदी आवडता खेळ असतो हे आम्हाला विसरायला झाल. आम्ही कांदेपोहे, बटाटेवडा आणि मिसळ अशी मस्तपैकी आर्डर दिली अणि नंतर चहा हेही आधीच सांगून् टाकल. तोपर्यंत आम्ही इकडेतिकडे बघत गप्पा मारत वेळ घालवला. आम्ही आर्डर केलेले पदार्थ आले अणि मग सगल्या गप्पा बंद करून लोकानी समोर येईल त्यावर आडवा हात मारला. कांदेपोहे, बटाटेवडा आणि मिसळ याची चव कही औरच होती.ऑफिसमधे असताना कधीही टपरीवारचा चहा न पिणारे अणि सकाळचा नाश्ताही २ वेळा तपासून बघणारे आमच्यातले काही महाभाग आज भूक लागली असल्याने कोणतीही तकरार न करता जेवत होते. माणूस परिस्तितीचा गुलाम ! दूसरा कही नाही. त्यानंतर लोकांना जरा सुस्ती आली. काहिनीतर चला झाला मस्त जेवण आता इथूनच परत पुण्याला असाही सुर काढला. मग थोड़ा वेळ प्रवासाचा शिण घालवायला आम्ही मुळशी धरणाच्या परिसरात भटकलो. कहिजण मग फोटो काढायला लागले तर काहिनी पाण्यात पाय सोडले. १५ - २० मिनीटे तिथे थांबून अणि हो टपरीवाल्याला त्याचे पैसे आणि अनेक धन्यवाद देउन आम्ही आमच्या फटफटी परत सुरु केल्या. खरतर सुरुवातीला फक्त दिवेआगर अणि हरिहरेश्वर एवढच डोक्यात होता. त्यानंतर पुढे कुठे जायचा काहीच पत्ता नव्हता अणि खर तर त्यातच खरी गम्मत होती. आम्ही ६ जण् ३ बाइक्स वर निघालो होतो फक्त मस्त भटकायला. आम्ही निघालो...छोतीमोठी गाव ओलांडत्, रस्त्यावरच्या पाट्या बघत तर कधी लोकाना विचारत विचारत सरतेशेवटी माणगावला आलो. तोपर्य्नत दुपारच्या जेवणाची वेळ जाली होती. साधारण १२:३० च्या सुमारास आम्ही माणगावला पोचलो.
आत्तापर्यंत मातीच्या बदलत्या रंगानी, हवेने अणि वळणदार रस्त्यानी कोकणाच्या आगमनाचे संकेत दिले होतेच. पण जेव्हा आम्ही माणगावला आलो त्यावेळी मात्र तिथल्या बाजारात असलेल्या फ़णस,आंबे अणि सुक्या माशांच्या सामूहिक वासाने अणि दर्शनाने कोकणागमनावर शिक्का मोर्ताब केलं. साधारण १२:३० च्या सुमारास आम्ही माणगावला पोचलो. थोडी खरेदी केल्यावर आम्ही जेवण उरकून घेतल. आता थेट दिवेअगरलाच थांबायच असा आधीच जहीर केल्याने लोक 'ओ' म्हाणेस्तोवर जेवले. तसच सलग २ तास ड्राइव्हिंग केल्याने अंग चांगलच आकसल होतं. पण समोर असलेला माशांचा कालवण अणि सोलकढी पिताना प्रवासाचा शीण् कुठल्या कुठे पळून् गेल आणि परत तिन्ही घोडेस्वार पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो.
कोकनातले रस्ते वळंदार अणि दिवस पण असा की ड्राइविंग साथी झकास त्यामुळे आम्ही सगळे आळीपाळीने बाईक चालवत होतो. गम्मत म्हणजे आमच्यातल्या एकाला बाईक चालवायची फार हौस नव्हती त्यामुळे प्रत्येक्जण त्याला स्वतःच्या बाईक बस म्हाणायचा ! म्हणजे दुसर्याला बिनभोबाट बाईक दामटता यायची. निर्मनुष्य वलंदर रस्त्यांवर काळजीपूरवक तर सरळ रस्त्यांवर बर्य्यापैकी वेगात असा आमचा तोपर्यन्ताचा प्रवास चालू होता. पण दुपारच्या जेवणात काय मिसळलं होत कुणास ठावुक पण त्यानंतर सगळेच गाड्या चालवत नव्हते तर चांगले हाणत होते.
कोकनातले रस्ते वळंदार अणि दिवस पण असा की ड्राइविंग साथी झकास त्यामुळे आम्ही सगळे आळीपाळीने बाईक चालवत होतो. गम्मत म्हणजे आमच्यातल्या एकाला बाईक चालवायची फार हौस नव्हती त्यामुळे प्रत्येक्जण त्याला स्वतःच्या बाईक बस म्हाणायचा ! म्हणजे दुसर्याला बिनभोबाट बाईक दामटता यायची. निर्मनुष्य वलंदर रस्त्यांवर काळजीपूरवक तर सरळ रस्त्यांवर बर्य्यापैकी वेगात असा आमचा तोपर्यन्ताचा प्रवास चालू होता. पण दुपारच्या जेवणात काय मिसळलं होत कुणास ठावुक पण त्यानंतर सगळेच गाड्या चालवत नव्हते तर चांगले हाणत होते.
माणगाव वरुन मग आम्हि मुम्बई - गोवा महामार्गाने महाडकडे निघलो आणि काहि वेळाने मग म्हसाळे फट्याला उजवीकडे वळून परते एकदा कोकणातल्या गावतून प्रवास करयला लागलो. अर्थात आत्तापर्यन्त आम्ही सगळा प्रवास हा रस्त्यवर्च्या पाट्या वाचुन केला होता पण आता मात्र गावातुन प्रवास सुरु झाल्यावर बर्याचदा पाट्या अधुन मधुन गयब झालेल्या असायच्या त्यामुळे थाम्बत, विचारत प्रवास सुरु होता. आत्तापर्यन्त सगल्यानाच ड्रायव्हिन्ग्चा थोडासा 'अतिआत्मविश्वास' आला होता. त्याच प्रत्यन्तर लगेचच थोड्या वेळाने अम्हाला आला. दुपारचे २:३० वाजलेले, दिवेआगार अता पन्नासेक किलोमिटर रहिल असेल नसेल आणि आम्हाला एक घाट लागला. आधिच मर्कट नि त्यात मद्य प्याला अशि स्थिति झालेली. कारण प्रवासचा शीण, भूक अणि अतिअत्मविश्वसाने 'भरावून' गेलेल्या घोडेस्वरानी गाड्या पळवायला सुरुवात केली. मी सर्वात पहिल्या बाइकवर होतो नि आमच्यातला सुजय सर्वात मागच्या बाइकवर होता. अत्तापर्यान्त तो आमच्यात सर्वात वेगाने गाडी चालवत्त होता. थोदावेळाने पठिमागून सचिन ने जोरात होर्न वाजवला आणि थांबण्याची खूण केली. काय झाल म्हणून विचारल तेव्हा सुजयची गाडी स्लिप झल्याच कळल. आम्हि ताबडतोब माघारी फिरलो आणि थोडच अन्तरावर सुजयची बाइक डिसली. सुदैवाने खरचटण्यापलिकडे कोणालच काही लागल नव्हता. उतारावर एका वळणावर वेगाचा अन्दाज न आल्याने गाडी स्लीप झाली आणि घसरत घसरत रस्त्याच्या कडेला असणार्या छोट्याश्या झुडुपाला जाउन थाम्बली. सहज म्हणून झुडुपाच्या पलिकडे जाऊन पहिल आणि काळजाचा थरकाप उडाला. झुड्पाच्या पलिकडे खोल दरी होती. जर झुडुप नसत तर काय झाला असत या विचाराने अंगावर काटा आला. सुजयने अनेक शिव्या खाल्ल्या हे काय वेगळ सान्गायला नकोच. पण याचा एकच फायदा असा झाला कि त्यानन्तर सम्पूर्ण ट्रिपमधे कोणीच निश्कल्जिपणे ड्रायव्हिंग् केल नाही.
दिवसभर ड्रायव्हिंग करुन नहि म्हणल तरी लोक जरा नरमली होती. त्यामुळे वाटेत जमेल तेव्हढ थाम्बत आणि प्रसंगी निर्मनुष्य रस्त्यावर आडवं पडून जमेलत्या प्रयत्नाने फ्रेश रहायचा प्रयत्न करत होतो. शेवटी सधारण दुपारी २:३०-३ च्या सुमरास आम्ही दिवेअगरला पोचलो. निघताना २-३ पत्ते घेतले होतेच त्याचा आता फायदा होणार असा वाटत असतानाच पहिली नकारघन्टा वाजली. दुसर्या दिवशी होळी असल्याने बरीच कामगार मंडळी सुट्टी घेउन आपापल्या गावी गेली होती. त्यामुळे बहुतेक ठिकाणी नकार मिळत होते. हो, पण् नकार देतानादेखील समोरचा माणुस अत्यन्त आदबशीर, नम्रपणे आणि हात जोडुन् बोलायचा आणि त्याच्वेळी आजुबाजूचे ४ पत्तेदेखील् द्यायचा. मग काय आमची मिरवणूक् त्या दिशेला वळायची. डोक्यावर रणरणतं ऊन अणि पोटात सपाटून लाग्लेली भूक या दोनच गोष्टी आता स्फुर्तीदायक् वाटत होत्या. शेवटी एका गल्लीच्या तोन्डाशी असलेल्या श्री.पाटील यान्च्या घरात आमची जेवणाची सोय झाली. मस्त थंडगार पाण्याने हातपाय धुतल्यावर आणि तहान भागवल्यावरकुठे मंडळीना जरा स्थैर्य आल. त्यानन्तर समोर वाढलेल उकडीच्या मोदकाच जेवण ही म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच होती. जेवणावर आडवा-उभा जसा जमेल तसा हात मारला आणि श्री.पाटील साहेबाना लाख लाख धन्यवाद दिले. आमचा जेवण होईपर्यन्त श्री. पाटील यानी आमच्या राहउयाचीदेखिल सोय केली होती. तिथे जवळ्च श्री.जोशी यान्च्या साकेत वर अमची रहायची सोय झाली. तसच तिथे जाण्यागोदर गणपतीचा दर्शन घ्यायचा सल्ला दिला. खरतर आम्हाला त्यावेळी स्वत: श्री.पाटीलच एखाद्या देवासारखे वाटत होते. मग रात्रीच्या जेवणाच आश्वासन देउन मग आम्ही ह्या बाप्पाचा निरोप घेतला अणि दुसर्या बप्पाच दर्शन घ्यायला निघलो. सोन्याच्या गण्पतीच दर्शन घेउन मग अम्हि पुढे श्री. जोशी यन्च्या साकेत वर अलो. त्यांनीही यथोचित स्वगत केल आणि आम्हाला आमची 'जागा' दाखवून दिली
. लहानपणी शालेतून आल्यावर दफ्तर टाकून ज्याप्रमाणे खेळायला जायचो त्याप्रमाणे सर्वात आधी समुद्रावर गेलो आणि पाण्यात मनसोक्त डुंबलो. समुद्राच्या वाळूत बाईक्स चालवल्या. हा अनुभव नवीन होता. तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळून मस्त दमून भाकून आम्ही परत साकेत वर आलो तर श्री जोशी यानी मस्त विहीरीत्ल्या पाण्याने आमची आंघोलीची सोय केली. मला एकदम माझ्या मामाच्या गावाची, आजोळ्ची आठवण झाली. त्या रात्री श्री. पाटिल यांच्याकडे परत एकदा सुग्रास जेवण उरक्ल्यावर मग आम्हि सगळे गावात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो. त्यादिवशी होळीपौणिमा असल्याने एकेठिकाणी मस्त पेटलेल्या होळिभोवताली बोंब मारणार्या लहान-मोतठ्यांमधे आम्हीहि सामील झालो. रात्री शीतल चंद्रप्रकाशात सागरकिनारी गेलो. कोणालाच फार काहिही बोलायची गरज वाटली नाही कारण काही क्षण हे अनुभवायचे असतात, जगायचे असतात. तिथून परत आल्यावर दिवसभराच्या श्रमाने आम्हाला कधी झोपा लागल्या ते समजलदेखील नाही..

दुसर्या दिवशी सकाळी जाग आली तीच मुळी पक्षान्च्या किलबिलाटाने आणि चूलीतल्या विस्तवात जळ्णार्या लाकडांच्या धूराच्या वासाने. बाहेर चांगलं उजाडल होता. पटापट आवरुन मग आम्हि सकाळचा नाष्टा उरकला. थर्मासमधला वाफाळलेला चहा आणि गरम गरम कान्दापोहे यांवर यथेछच ताव मारला. दीवेआगर - हरिहरेश्वर ही जोड्गोळी माहिती होती त्यामुळे इथून हरिहरेश्वर गठायच हे अगदी निश्चित होता. पण त्याचबरोबर आता इथुन पुढे कसा जायचा हा प्रश्ना होता अणि अर्थातच श्री. जोशी इथेही आमच्या मदतीला आले. त्यानी पुरवलेल्या महितीनुसार हरिहरेश्वरला जायचे २ मार्ग होते. एक गावतून जाणारा तर दुसरा थोडा अवघड पण समुद्राच्या शेजारून जणारा. सर्वानी एकमताने (कधी नव्हेते !) दुसर्या मार्गाने जाण्यचा ठराव पास केला. मग सुरु झाला दीवेआगर - हरिहरेश्वर असा तो रोमांचकारी प्रवास्. रोमांचकारी अशाकर्ता की हा रस्ता फार चांगल्या अवस्थेत नव्हता त्यामुळे गाड्या काळजीपूर्वक चालवाव्या लागत होत्या आणि त्याचवेळी प्रत्येकाला एकाबजूने डोंगररांगा आणि दुसर्याबजुने समुद्राची सोबत या मनोहारी द्रुष्याचा साक्षिदार् व्हायं होतं. आम्हि निसर्गाचा हा देखावा कँमेर्यात बन्दीस्त करत होतो. या रस्त्याने जाता जाता कधी आम्ही हरिहरेश्वरला पोचलो ते समजलदेखील नाही. मन्दिरात जाऊन आम्हि दर्शन घेउन बाहेर आलो. सहज म्हणुन प्रदक्शिणा मर्गावर गेलो आणि एकुणच हे काम आपल्या अवाक्याबहेरचा अहे हे जाणवल. सम्पूर्ण प्रुथ्वीला प्रदक्शिणा घालण्याऐवजी स्वत:च्या आई वडिलाना प्रदक्शिणा घालणार्या गजाननाच्या दन्तकथेची आम्हाला ऐन्वेळी आठवण झाली आणि मग आम्हीपण तिथेच देवळाला एक लहानशी फेरी मारून घेतली. तिर्थप्रसाद घेउन बहेर आलेल्या आम्च्यासमोर यक्ष प्रश्न उभा होता तो म्हणजे आता पुढे काय? योगायोगाने आम्हाला तीथेच देवळबाहेर एका दुकानात हरिहरेश्वर आनि परिसराचा एक नकाशा मिळाला. वीतभर लांबीचा तो तुकडा पाहून त्याच्यावर कितपत् विश्वास ठेवावा हाही एक प्रश्णच होता. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतातना ते यालाच कारण तसाही अमच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्ह्ता. समोर दिसणार्या देवळाच्या कळसाला नमस्कार करून आमची वरात निघाली. वाटेत एके ठिकाणी थाम्बून चहा - पाणी आणि नकाशावाचन करून असा ठरल कि इथुन पुढे बाण्कोट गाठायचा आणि तिथुन रस्त्याने केळ्शीला जायच. चलो केळ्शी म्हणत अम्ही बाणकोटचा रस्ता धरला. रस्ता तसा कच्चा आणि खाचखळग्यानि भर्अलेला होता आणि सम्पूर्णा प्रवासात ज्या गोष्टिची आम्हाला भिती वाटत होती ती घड्ली. मी चालवत असलेली बाइक पन्क्चर झाली. अजुबाजुला एकही दुकान दीसत नव्हत तरी नशिबानी थोड्या अन्तरावर एक वस्ती दिसत होती. तिथे जायला निघालो तर वाटेत एके ठिकाणी ‘शौकीन’ सचिनला एकजण ताडी काढताना दिसला. हा पठ्या लगेच तीथे जाउन त्या इसमाकदुन २ द्रम भरुन ताजी ताजी ताडी घेउन आला. प्रत्येक्जण उन्हाने तहानलेला होता. आम्ही कही जणानि ताडीचा मन्सोक्त आस्वाद घेतला. एखद्या शहाळ्याच्या पाण्याला लाजवेल अशा त्या गोडसर ताज्या ताडीने आम्हि आमच्या तहान भागवल्या आणि उरलेली कँनमधे अम्च्याबरोबर ठेवुन दिली. ताडी म्हणल्याबरोबर कपाळाला अकारण आठ्या पाडणारे कही जण होतेच आमच्याबरोबर्. शेवटी पन्क्चर झालेली ती गाडी कधी ढकलत तर कधी चालवत आणि हो ताडी पित पित अम्ही एक्दाचे त्या वस्तीजवळ आलो. अधे मधे गाडी ढकलायची वेळ अम्च्यापैकी प्रत्येकावर एकेकदा आली त्यामुळे ताडीला 'अब्राह्मण्यम्' म्हणणार्यानी पण मन आणि झक मारत शेवटी ताडी प्यालीच.
आम्हि त्या छोट्याशा वस्तीला आलो आणि पन्क्चर कढायची सोय कुथे होउ शकेल याचा अन्दाज घ्यायला लगलो. खुप वेळ शोधल्यावर एक सायकलचं दुकान वजा घर दिसल. तिथल्या माणसाने बाईकच पन्क्चर कढायला असमर्थता दाखवली आणि एवधेच नाही तर जवळ्पास कुठेच हे काम करुन मिळणार नही असा सांगून दुसरा बॉम्ब टाकला. शेवटी त्याच माणसाला बाबा-पुता करून आम्हि तयार केल. मग अम्हिही मदत करायला लागलो आणि शेवटी बर्याच प्रतत्नानी ते बाइक्च चाक देहावेगळ केल, त्यातली ट्युब काढून त्यातल पन्क्चरदेखिल काढल. पॅच लवताना मात्र सगळे सोपस्कार सायकल दुरुस्तीप्रमाने झाले आणि शेवटी माझी ती बाइक पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाली. माणसाचा ऑपरेशन करणार्याने एखाद्या गुराला टाके मारावेत ना! तसा प्रकार होता सगळा. एक छोटासा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करून आम्हि तिथुन निघालो. एव्हाना दुपारचे बारा वाजले होते. शेवटी मजल दरमजल करत करत आम्हि बागमांडला येथे पोचलो. मगाशी भेटलेल्या सायकलवाल्याने अम्हाला बागमांडला येथुन सुटणार्या फेरिबोट्विशयी माहिती दिली होतीच. जेव्हा आम्हि तिथे पोहोचलो तेव्हा एक फेरिबोट थोद्याच वेळात निघणार होती मग काय क्षणाचाही विलंब न करता आम्हि आमच्या बाइक्स त्या लॉंन्चमधे घातल्या आणि मग कोकणातली आम्ची पहिली समुद्रसफर सुरु झाली. आम्हाला सर्वानाच खुप अनन्द झाला होता. याला २ करणे होती एक म्हन्जे केळ्शीला बाइक्ने पोचायला १ -१:३० तास सहज लागला असता. तो त्त्रास तर वाचलाच पण अनपे्क्षीतपणे हा छोटासा पाण्यावर्चा प्रवास करायला मिळाला. साधारणत: अर्ध्या तासानन्तर आम्हि पलिकडे बाणकोटला पोचलो. किनर्यावर पोचतानाच आम्हाला दुरूनच गावातले लोक एक मिरवणुक काढत नाचताना दिसले. लहान्पणी होळीच्या दिवशी घालायचो तशा मुखवट्यांची आठवण झाली. कालच होळिपोर्णिमा झाली होती. आपल्या सग्ल्यान्चा पण प्रकर्षाने कोकणातला महत्वाचा सण. अर्थात त्याची प्रचिती आम्हाला अद्ल्यादिवशी दिवेआगारलाच आली होती. आम्हि या विचारात असताना ती मिरवणुक आम्हाला येउन भिडलीदेखील. आम्ही सगळे बाइक्वर होतो आणि नवखे दिसत असल्याने जमावाने आम्हाला आडवले. अर्थात हे सगळ अगदी सहज, रिवाजाप्रमाणे आणि कोणालाही त्त्रास न देता. अर्थातच आम्ही देखील हा 'पहुणचार' छान एन्जॉय करत होतो. त्यांच्याबरोबर एक लहानसं फोटोसेशन करून आणि परत भेटूच असा आश्वासन देउन आम्ही पुढे निघालो. त्या छोट्याशा वस्तीतुन पुढे जात्ताना आणि आजुबाजुला बघताना आम्हाला फार मजा वाटत होती. एकेठिकाणी थोडं थांबून आम्ही मस्त थन्डगार पाणी प्यालो. अगदी सहज म्हणून आम्ही थोडावेल्पूर्वी मिळालेला तो नकाशा परत एकदा नजरेखालून घातला आणि एकदम लक्षात आल कि त्यात आम्हि आत्ताच पार केलेल्या खाडीचा भागदेखील अगदी व्यवस्थित दाखवला होता. आमचा सगळ्यांचा त्या कागदाच्या तुकड्यावर एकदम विश्वास बसला. बुडत्याला आता काडीचा नव्हे तर चांगला ओंण्ड्क्याचा आधार होता आता!
पुढे आता आम्हाला जायच होतं केळशीला. परत एकदा गाड्यांवर स्वार होऊन आम्हि भरपूर ऊन, खड्डे आणि धूळ अशा परिस्थितीतून प्रवास सुरु केला. वाटेतल्या छोट्या छोट्यावस्त्यांमधली लहान लहान मुले वाटेत गाड्य आडवून होळीची वर्गणी मागत होती. त्याना कधी पैसे देत तर कधी नकार असं करत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवल. पुढे वाटेत आम्हाला एक छोट्स गाव लागल जिथे दोन गटात रस्सीखेच चालु होती. आधिक विचारणा केल्यावर होळिच्या सणानीमित्त हा खेळ चालू असल्याच समजल. तेव्ह्ढ्यात तिथल्या लोकांची नजर आम्च्यावर गेली आणि त्यानी मग आम्हालाही त्यात सहभागी व्हायला सान्गितल. आता त्यानी अम्च्या गाड्या आडव्ल्यामुळे दुसरा इलाजच नव्हता. मग काय विचारता, एकीकडे आम्हि आणि दुसरीकडे गावातले लोक यान्च्यात रस्सेखेच सुरु झाली. कोकणात्ल्या चीवट्पणासमोर शहरी चालूपणाचा निभाव तो काय लागणार ! तरिदेखील ३ पैकी १ दा आम्हि जिन्कलो. कालपासून कोकणमधे फिरताफिरता आणि हे सगळ अनुभव घेताना खर तर आम्हि कधि कोकणातलेच एक होउन गेलो ते समजलसुधा नाही. त्या सगळ्या लोकांचे आभार मानून आणि त्याना लाख लाख धन्यवाद देत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
पुढे मग आम्हि केळशी गाठल आणि मग तिथून अन्जर्ले येथे आलो. सर्वात पहिल्यांदा आम्हि तेथे कुठे खायला काही मिळत का याचा शोध घ्यायला लगलो. त्यादिवशी तिथेच कुठेतरी राहुन मग दुसर्यादिवशी परतीचा प्रवास करावा असा निर्णय घेतला. पण परत एकदा होळिनीमित्त कामगार सुटीवर गेल्याने कुठेच आमची जेवायची आणि पर्यायाने रहायची सोय होउ शकली नाही. सर्वठिकाणी मिळाला तो आदबेने हात जोडून नम्र नकार. शेवटी परत एकदा नकाशा पाहून आम्हि दापोलीला जायचा निर्णय घेतला कारण यापुढे लहान लहान गावात राहायची सोय होइल याची खात्री नव्हती. पण पोटतली भूक काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. आम्हि अन्जर्ले गावात्तल्या त्या चोट्याशा गवात कुथे काही खायला मिळते का ते बघायला लागलो. एका मस्त छोटेखानी टुमदार घरात शेवटी आमची खाण्याची सोय झाली. त्या माउलीने केलेले ते गरम गरम कांदेपोहे खाता खाता कोकणातली ती भुकेली सन्ध्याकाळ त्रुप्त झाली. त्यानन्तर आमची सुस्तावलेली फटावळ थोद्याश्या सन्थपणे दापोलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. एव्हाना सन्ध्याकाळचे ५ - ५:३० वाजले होते आणि आम्हि वळणदार आणि सभोवताली गर्द झाडी असलेल्या रस्त्यांवर ड्रायव्हिंगची मजा घेत हळुहळु अन्जर्ले गावाचा निरोप घेत होतो. अंजर्ले सोडून मग आम्ही हर्णेला जायचा रस्ता पकडला. आता घाटमाथ्यावरून हळूहळू आम्ही खाली उतरायला लागलो. अधुन मधुन एखाद्या वळणावरुन खाली समुद्रात नांगर टाकून पहुडलेल्या आणि रन्गीबेरंगी झेंडे लवलेल्या मच्छीमार्यन्च्या होड्या फारच सुन्दर दिसायच्या. उतरत उतरत आम्ही परत एकदा समुद्रसपाटीला आलो. समुद्रालगतच्या वस्त्यामधुउन आमचा प्रवास सुरु होता. या संपूर्ण प्रवासात दूरवर समुद्रात आम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला बराच वेळ दिसत राहिला.
आता हर्णेरोडने दापोलीला पोचायच आणि वेळ मिळेल तर मग पुढे दाभोळ गाठायचा असा बेत होता. खरतर आम्हि असं ठरवल होता कि दभोळला जाउन परत एकदा जेट्टी पकडायची. ती म्हणे थेट गुहागरला जाते. तिथे श्रीगणेशाच दर्शन घेउन मघारी फिरायच असा बेत होता. पण ही सहल नव्हती तर फक्त भटकंती होती त्यामुळे योजलेले कार्यक्रम आणि आखलेल वेळापत्रक कोलमडण्यातच खरी मजा होती. आम्हि दापोलीला पोचलो तेव्हा २ दिवसानान्तर आता खरच एखाद्या शहरात आल्याची जाणिव झाली. तिथे पोचल्या पोचल्या पहिली गोष्ट् म्हणजे मोबाइलची रेन्ज आली त्यामुळे प्रत्येकाने पहिला घरी फोन करून प्रवास सुखरुप होत असल्याच कळवलं. एव्हाना सूर्यास्ताची चाहूल लागली होती. आम्हि आमचा गुहागरचा प्लॅन अजूनतरी आमच्यापाशीच ठेवला होता. परत एक्दा मजल दरमजल करत आम्हि दाभोळ्च्या अगदी जवळ अलो. घाटमाथ्यावरून गावाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. घाट उतरता उतरता एका वळ्णावर अनपेक्षितपणे तो मवळता सूर्यनारायण आमच्या समोर आला. लालसर सोनेरी दिसणारा तो गोळा अस्ताला जात होता. गेले दोन दिवस आम्हि विस्तिर्ण समुद्र, विशाल सागरतीर, नारळी पोफळीची बनं पहात होतोच पण आता निसर्गाने त्याच अजुन एक रुप दाखवून परत एकदा आमचं खुजेपण दाखवुन दिलं. हा सूर्यास्त दाभोळच्या समुद्रकिनार्यवरून बघायचाचं हे ठरवून आम्हि खाचखळ्ग्यातून वाट काढत समुद्रावर आलो पण तोपर्यंत थोडासा उशीर झाला होता. दुर एकाकडेला बन्द पड्लेला दाभोळ वीजप्रकल्पसोडून आम्हाला दुसरं काहीच दिसल नाही. त्यादिवशी आम्ही दाभोळलाच एका लहानश्या हॉटेलवर राहिलो. रात्री जेवणासाठी मस्त ताजे ताजे मासे होते. रात्री भरपूर जेवण करून आम्हि सहज म्हणून एक चक्कर मारायला बाहेर पडलो. सहज फिरत फिरत आम्हि समुद्राच्या बजूला आलो. तिथे एक छोटीशी लॉन्च काही प्रवाशाना घेऊन निघणारच होती. आम्हि त्याना विनवणी केल्यावर ते आम्हाला घेऊन जायला तयार झाले. मग काय विचारता इकडून् त्या किनार्यावर आणि तिथुन परत असा तो अर्ध्या-पाउण तासाचा प्रवास कधीच सम्पु नये अस वाटत होत. समुस्राच्या पाण्याचा सन्थ अवाज, मन्द सुटलेला वारा आणि चन्द्रप्रकाश्...धुन्दी चढायला असा कितिसा वेळ लाग्णार ! त्यानन्तर बराचवेळ गप्पागोष्टी करण्यात मस्त गेला.
आद्ल्या दिवशी केलेला प्रवास आणि रात्री उशीरा झोप यामुळे दुसर्यादिवशी उठायला अंमळ उशीरच झाला. अर्थातच आम्ही आमचा गुहागर प्लन रद्द केला. आता परत दापोली गाठायच ठरल आणि तिथुन पुढ्चं पुढे बघु असा विचार करून आम्ही निघालो. आम्च्याकड्चा तो नकाशा आता आम्हाला उपयोगी पड्णार नव्हता कारण त्यात दापोलीच्या पुढचं काहीच नव्हत. तरीपण आत्तापर्यन्त त्याने आमची सोबत केली होती त्यामुळे एक आठ्वण म्हणून तो तुकडा आम्ही जपून ठेवला.
दापोली पर्यन्तचा प्रवासदेखील मस्त झाला एकदम्. अजुबजुची आंब्याची झाडं आत्ताकुठे मोहरायला लागली होती. त्याचा घमघमाट सोबतीला होताच. आता फक्त अचानकपणे पाउस नाही पडला तर यावेळी फळ चांगल येणार याची ही नान्दीच होती जणू! बाजूने असलेल्या काजूच्या झाडानादेखील लाल्-पिवळे कजूगर लटकत होते. अशा वातावरणात मन उधाण होईल नाहीतर काय! आम्हि दगड मारून २-४ कजूगर पाडले. ते खाताना त्यातला रस सांडून आमच्या कपड्यान्वर 'कायमचे' डाग पड्ले. असच रमत गमत आम्हि दापोलीला पोहोचलो. तीथे उदरम्भ्ररणम करून मग महाडला आलो. महाड सोडलं आणि थोड्याच अन्तरावर अम्हाला शिवथरघळच्या पाट्या दिसायला लागल्या. आता इतके लाम्ब आलोच आहोत तर समर्थांच्या ह्या घळीत जाउन दर्शन करून यावं हा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. "जनी वन्द्य ते सर्व भावे करावे" म्हणत आम्ही महाड - भोर मार्गावर डावीकडचा शिवथरघळचा फाटा पकडला.आत्तापर्यन्त कोकणात्ल्या त्या हिरवाईने आमच्या डोक्यावर सतत छत्र धरलं होतं आणि कडक उन्हापासून आमचा बचाव केला होता. आतामात्र आम्ही कोकणातुन बाहेर आल्याने अगदीच 'उघद्यावर्'पडलो होतो. आम्हि भर दुपारी २:३० - ३ च्या उन्हात त्या घाळीत गाड्या घातल्या आणि आम्हाला उन्हाने जाळायला सुरुवात केली. आजुबजुला कमाल शुष्क प्रदेश आणि रखरखाट यातून आम्हि गाड्या दामटत होतो. सततच्या कोरड्या वार्यान्मुळे आमच्या घशाला कोरड पडत होती आणि त्यातच अम्च्याकडच पाणीही संपलं. शेवटी कसाबसा केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर आम्हि शेवटी एकदाचे घळीत पोचलो. गेल्या गेल्या तिथल्या रांजणांमधे भरून ठेवलेल थंडगार पाणी उदंड प्यालो. समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जागेत एक चक्कर मारून मग सायंकाळी ५ च्या सुमरास आम्हि परत नघालो. परतताना लांब अजगराप्रमाणे वाटणार्या वरन्धा घाटात आम्हि 'माकडान्च्या' साक्षीने चहापान कार्यक्रम उरकला. (हे उद्गार 'माकडांचे' नाहीत आमचे आहेत.) पुढे नंतर तिथे काढलेल्या फोटोंमधला आमचा अवतार पाहून कदाचित त्या माकडांची अम्च्याबद्दल हीच प्रतिक्रिया असू शकेल अस वाटलं. घाट उतरून भोर-खेड-शिवापुर मार्गे सन्ध्याकाळी ७:३० वाजता आम्हि पुण्याला परत आलो.
दापोली पर्यन्तचा प्रवासदेखील मस्त झाला एकदम्. अजुबजुची आंब्याची झाडं आत्ताकुठे मोहरायला लागली होती. त्याचा घमघमाट सोबतीला होताच. आता फक्त अचानकपणे पाउस नाही पडला तर यावेळी फळ चांगल येणार याची ही नान्दीच होती जणू! बाजूने असलेल्या काजूच्या झाडानादेखील लाल्-पिवळे कजूगर लटकत होते. अशा वातावरणात मन उधाण होईल नाहीतर काय! आम्हि दगड मारून २-४ कजूगर पाडले. ते खाताना त्यातला रस सांडून आमच्या कपड्यान्वर 'कायमचे' डाग पड्ले. असच रमत गमत आम्हि दापोलीला पोहोचलो. तीथे उदरम्भ्ररणम करून मग महाडला आलो. महाड सोडलं आणि थोड्याच अन्तरावर अम्हाला शिवथरघळच्या पाट्या दिसायला लागल्या. आता इतके लाम्ब आलोच आहोत तर समर्थांच्या ह्या घळीत जाउन दर्शन करून यावं हा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. "जनी वन्द्य ते सर्व भावे करावे" म्हणत आम्ही महाड - भोर मार्गावर डावीकडचा शिवथरघळचा फाटा पकडला.आत्तापर्यन्त कोकणात्ल्या त्या हिरवाईने आमच्या डोक्यावर सतत छत्र धरलं होतं आणि कडक उन्हापासून आमचा बचाव केला होता. आतामात्र आम्ही कोकणातुन बाहेर आल्याने अगदीच 'उघद्यावर्'पडलो होतो. आम्हि भर दुपारी २:३० - ३ च्या उन्हात त्या घाळीत गाड्या घातल्या आणि आम्हाला उन्हाने जाळायला सुरुवात केली. आजुबजुला कमाल शुष्क प्रदेश आणि रखरखाट यातून आम्हि गाड्या दामटत होतो. सततच्या कोरड्या वार्यान्मुळे आमच्या घशाला कोरड पडत होती आणि त्यातच अम्च्याकडच पाणीही संपलं. शेवटी कसाबसा केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर आम्हि शेवटी एकदाचे घळीत पोचलो. गेल्या गेल्या तिथल्या रांजणांमधे भरून ठेवलेल थंडगार पाणी उदंड प्यालो. समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या जागेत एक चक्कर मारून मग सायंकाळी ५ च्या सुमरास आम्हि परत नघालो. परतताना लांब अजगराप्रमाणे वाटणार्या वरन्धा घाटात आम्हि 'माकडान्च्या' साक्षीने चहापान कार्यक्रम उरकला. (हे उद्गार 'माकडांचे' नाहीत आमचे आहेत.) पुढे नंतर तिथे काढलेल्या फोटोंमधला आमचा अवतार पाहून कदाचित त्या माकडांची अम्च्याबद्दल हीच प्रतिक्रिया असू शकेल अस वाटलं. घाट उतरून भोर-खेड-शिवापुर मार्गे सन्ध्याकाळी ७:३० वाजता आम्हि पुण्याला परत आलो.
गेले २-३ दिवस आम्ही कोकणात मनमुराद भटकलो होतो, अनेक गाव फिरलो, बर्याच माणसाना भेटलो. सुरुवातीला कोकणात जाउन तिथे फक्त भटकायची आमची ईच्छा होती. आम्हाला भटकण्याचा अनुभव तर आलाच पण ह्या सगळ्याच्या पलिकडे आम्हि जे कोकण अनुभवल ते आम्हाला बरच काहि देउन आणि शिकवून गेलं. हा अनंद घेताना आम्हिदेखिल कचरा न करणे, मोठ्याने ओरडुन गोंघळ न घालणे आणि गावात्ल्या लोकांशी नम्रपणे वागणे अशा काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. या लहान्-मोठ्या गोष्टींच भान, कोकणाबद्द्ल वाटणार प्रेम आणि ईच्छाशक्तिच्या जोरावर आम्हि सगल्यानीच आमचं कोकण भटकंतीच स्वप्न साकार केलं.
भटक्यांसाठी आमच्या कोकण सफरीच्या मार्गाची लिंक देत आहेhttp://www.konkanyatra.com/roadmap.html
No comments:
Post a Comment